Viral Video: १० मिनिटे उशीरा आली म्हणून सरकारी शाळेतल्या मुख्याध्यापकाने शिक्षिकेला चपलेने मारले
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 07:24 PM2022-06-26T19:24:11+5:302022-06-26T19:24:20+5:30
मुख्याध्यापकाच्या या संतापजनक कृत्यामागे कारणही धक्कादायक आहे. उत्तर प्रदेशमधील सरकारी शाळेतील ही घटना आहे.
शाळेला विद्येचं माहेरघर, ज्ञानाचं मंदिर म्हटलं जातं. पण याच मंदिरात एका मुख्याध्यापकाने चक्क एका शिक्षिकेला चपलेने मारहाण केली आहे. शाळेत शिक्षिकेला चपलेने मारणाऱ्या मुख्याध्यापकाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. मुख्याध्यापकाच्या या संतापजनक कृत्यामागे कारणही धक्कादायक आहे. उत्तर प्रदेशमधील सरकारी शाळेतील ही घटना आहे (Principal beaten female teacher with shoes).
लखीमपूर खेरी जिल्ह्यातील माहुंगू खेडा शाळेत घडलेला हा प्रकार. सराकारी शाळेतील मुख्याध्यापकाने महिला शिक्षिकेला चपलेने मारलं. व्हिडीओमध्ये मुख्याध्यापक शिक्षिकेला जोरजोरात मारताना दिसत आहे. यावेळी शाळेतील इतर शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थीही उपस्थिती असल्याचं व्हिडीओत दिसतं. अजित वर्मा असं या मुख्याध्यापकाचं नाव आहे. मुख्याध्यापकाने शिक्षिकेला अशी निर्दयीपणे मारहाण करण्याचं कारण म्हणजे तिला शाळेत यायला उशीर झाला. शाळेत 10 मिनिटं उशिरा आल्याने मुख्याध्यापकाने शिक्षिकेला अशी भयंकर शिक्षा दिली.
#WATCH | Principal of a government school in Uttar Pradesh's Lakhimpur thrashed a female teacher with shoes
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) June 24, 2022
(Source: Viral video) pic.twitter.com/hCRiMuVsgV
एएनआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, जिल्हा मूलभूत शिक्षण अधिकारी (BSA- मूलभूत शिक्षा अधिकारी) लक्ष्मीकांत पांडे यांनी माहिती दिली आहे की, व्हायरल व्हिडिओच्या आधारे मुख्याध्यापकांना निलंबित करण्यात आले आहे.