Video: PPE किट्स घातलेला अँम्ब्युलन्स ड्रायव्हर लग्नाच्या वरातीत शिरला; भन्नाट डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 11:19 PM2021-04-27T23:19:26+5:302021-04-27T23:20:23+5:30
सुरुवातीला या व्यक्तीला पाहून वरातीमधील माणसं आश्चर्यचकीत झाले. त्यानंतर माहिती मिळाल्यानंतर लोकांनीही त्याच्यासोबत डान्सचा आनंद लुटला.
हल्द्वानी – उत्तराखंड्या हल्द्वानी शहरातील मेडिकल कॉलेजच्या बँड बाजासह एक व्यक्ती पीपीई किट्समध्ये नाचतानाचा व्हिडीओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला. पीपीई किट्समध्ये डान्स करणारा हा व्यक्ती रुग्णवाहिकेचा चालक असल्याचं कळतंय, जेव्हा वरात हॉस्पिटलच्या बाजूने जात होती. तेव्हा बँड बाजाचा आवाज ऐकताच रुग्णवाहिकेचा चालक त्याठिकाणी जाऊन डान्स करत असतानाचा हा व्हिडीओ आहे.
सुरुवातीला या व्यक्तीला पाहून वरातीमधील माणसं आश्चर्यचकीत झाले. त्यानंतर माहिती मिळाल्यानंतर लोकांनीही त्याच्यासोबत डान्सचा आनंद लुटला. या डान्सचा व्हिडीओ शेजारी असलेल्या मेडिकलमधील दुकानदाराने त्याच्या मोबाईलमध्ये शूट केला. सध्या हाच व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. माहितीनुसार, रुग्णवाहिकेच्या चालकाचं नाव महेश आहे. तो मागील काही दिवसांपासून कोविड रुग्णांचे मृतदेह स्मशानभूमीला पोहचवण्याचं काम करतो.
Ambulance driver started dancing in a Marriage wearing PPE Kit, reason told to burst his stress of continues duty.#COVID19India#stressfreeliving#stressmanagement#LifeGoesOnpic.twitter.com/heL5RMyyGx
— Gaurav Joshi (@Gauravjionline) April 27, 2021
ज्यावेळेला लग्नाची वरात हॉस्पिटलच्या शेजारून जात होती. तेव्हा रुग्णवाहिकेच्या चालकाने तणाव दूर करण्यासाठी बँड बाजा सुरु असताना तिथे पोहचला आणि डान्स करू लागला. सोशल मीडियावर या डान्सबद्दल अनेकांच्या विविध प्रतिक्रिया येत आहेत. काही लोक तणाव दूर करण्याचा मार्ग म्हणत आहेत तर काही जण असंवेदनशील असल्याचं बोलत आहेत. या कठिण प्रसंगात चहुबाजूने मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश ऐकायला मिळत असताना त्याचा आरोग्य कर्मचाऱ्याच्या मनावरही मोठा परिणाम होत आहे. अनेक तास काम केल्यानतर लोक तणाव दूर करण्यासाठी विविध पर्याय शोधत आहेत. काही दिवसांपूर्वी कोविड वार्डात डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता अँम्ब्युलन्स चालकाचा हा व्हिडीओ प्रचंड गाजत आहे.