नवरीला राग कधी येईल...! नवऱ्याकडच्यांनी स्वस्तात कटवले, लेहंग्यावरून तिने लग्नच मोडले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 12:41 PM2022-11-17T12:41:32+5:302022-11-17T12:42:01+5:30
आपल्याकडे लग्न म्हटले की मोठा थाट असतो. आता लग्नाचा सीझन सुरू झाला आहे. त्यामुळे लग्नासंदर्भातील वेगवेगळ्या बातम्या समोर येतात.
आपल्याकडे लग्न म्हटले की मोठा थाट असतो. आता लग्नाचा सीझन सुरू झाला आहे. त्यामुळे लग्नासंदर्भातील वेगवेगळ्या बातम्या समोर येतात. सध्या उत्तराखंडमधील एका लग्नातील अशीच एक बातमी समोर आली आहे. ऐन लग्नाच्या दिवशीच एका नववधूने लग्नाला नकार दिल्याचे समोर आले आहे. या नकाराचे कारण तुम्ही ऐकले तर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.
मुलाकडच्या लोकांनी वधुला स्वस्तातला घागरा दिला होता, त्यामुळे वधुने थेट लग्नालाट नकार दिल्याचे समोर आले आहे. उत्तराखंडमधील हल्द्वानीच्या राजपुरा परिसरातील ही घटना आहे. येथील एक तरुणीचे लग्न होते. लग्नाच्या काही तासाअगोदर तिला घागरा मिळाला. तिने मुलाकडच्या लोकांनी खरेदी केलेल्या घागऱ्याची किंमत पाहिली, यावेळी या घागऱ्याची किंमत फक्त 10,000 रुपये होती. यावेळी तिने रागाच्या भरात तो फेकून दिला, आणि लग्नाला नकार दिला. तो घागरा खास लखनौहून मागवला होता. अखेर हे प्रकरण पोलिसात गेले.
प्रेमासाठी काय पण! 19 वर्षांची शुमाइला 70 वर्षीय लियाकतच्या प्रेमात, जगाची पर्वा न करता केलं लग्न
पोलीस ठाण्यात तासाभर प्रकरणावर चर्चा झाली. यानंतर दोन्ही पक्षाकडून लग्न रद्द करण्याचा निर्णय घेतला. हे प्रकरण मिटवण्यासाठी हल्दवणी पोलिसांनी खूप प्रयत्न केले. मात्र दोन्ही बाजूंनी समेट घडवून आणण्यात त्यांना यश आले नाही.