प्रतिस्पर्ध्याची मान मोडली, मग मान हलवून नीट तपासली आणि मग उभा राहिला, कुस्तीपटूचा आखाड्यात तडफडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 12:39 PM2021-09-09T12:39:40+5:302021-09-09T13:58:43+5:30

 या कुस्तीपटूची मान मोडली. त्यानंतर दोन -तीन वेळा त्याची मान हालवून पाहिली आणि मग तो मागे हटला. लोक मात्र ही घटना डोळ्यादेखत सुरु असताना टाळ्या वाजवत राहिले. २ सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेत या पैलवानाचा अंत झाला मात्र, गेले सहा दिवस ही घटना गुपित ठेवण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच या प्रकरणाचा खुलासा झाला.

Uttarakhand pailwan wrestler killed during wrestling in Moradabad faridnagar , shocking video goes viral | प्रतिस्पर्ध्याची मान मोडली, मग मान हलवून नीट तपासली आणि मग उभा राहिला, कुस्तीपटूचा आखाड्यात तडफडून मृत्यू

प्रतिस्पर्ध्याची मान मोडली, मग मान हलवून नीट तपासली आणि मग उभा राहिला, कुस्तीपटूचा आखाड्यात तडफडून मृत्यू

Next

ठाकूरद्वारा येथील फरीदनगर गावात झालेला कुस्तीच्या सामन्यात एका कुस्तीपटूचा मृत्यू झाला. यात घडलेली अत्यंत धक्कादायक गोष्ट म्हणजे, प्रतिस्पर्धकानं या कुस्तीपटूची मान मोडली. त्यानंतर दोन -तीन वेळा त्याची मान हालवून पाहिली आणि मग तो मागे हटला. लोक मात्र ही घटना डोळ्यादेखत सुरु असताना टाळ्या वाजवत राहिले. २ सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेत या पैलवानाचा अंत झाला मात्र, गेले सहा दिवस ही घटना गुपित ठेवण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होताच या प्रकरणाचा खुलासा झाला. पोलीस अजूनही या घटनेची माहिती देण्यास नकार देत आहेत.

मुरादाबादच्या ठाकूरद्वारातील फरीदनगरमध्ये कुस्तीचा सामना आयोजित करण्यात आली होती. गावकऱ्यांच्या मते, नौमी मेळ्यात परवानगीशिवाय रिंगण सजवण्यात आले होते. यामध्ये काशीपूर, उत्तराखंड येथील कुस्तीपटू महेश कुमार देखील सहभागी झालेला. या दरम्यान महेशचा फरीदनगरचा पैलवान साजिद अन्सारीसोबत कुस्ती सामना झाला. कुस्तीदरम्यान साजिदने महेशला उचलले आणि खाली आदळले तेव्हा महेश मानेवर आदळला. यामध्ये महेशची मान तुटली. तो जमिनीवर कोसळला आणि तडफडू लागला. दुसरीकडे, कुस्ती पाहणारे लोक साजिद पैलवानाच्या विजयासाठी टाळ्या वाजवत होते. 

आयोजकांनी जेव्हा महेशला उचललं तेव्हा त्याची मान एका बाजूला लटकलेली होती. मसाज करून मान जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला पण महेशचा मृत्यू झाला होता. गावातील पंचायतीनंतर ६० हजार रुपयांची नुकसान भरपाई सुनावत हे प्रकरण शांत करण्यात आलं. 

यातील आणखी धक्कादायक बाब म्हणजे कोणीही त्याला उपचारासाठी रुग्णालयातही घेऊन गेलं नाही. पोलिसांनाही या घटनेची माहिती देणं तेथील लोकांना महत्त्वाचं वाटलं नाही. बुधवारी पैलवानाच्या मृत्यूचा व्हिडिओ ट्वीटरवर व्हायरल झाल्यानंतर घटना समोर आली. एसपी देहात विद्या सागर मिश्रा यांनी सांगितलं, की पोलिसांना कोणीही पैलवानाच्या मृत्यूची माहिती दिलेली नाही. इंटरनेटवर व्हायरल झालेला व्हिडिओही आम्ही पाहिला नाही. तक्रार आल्यानंतर तपास करून कारवाई केली जाईल.

Web Title: Uttarakhand pailwan wrestler killed during wrestling in Moradabad faridnagar , shocking video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.