बोंबला! नवऱ्यानं ज्या महिलांच्या फोटोला लाईक केलं होतं; त्याची प्रिंट काढली अन् दिलं व्हॅलेंनटाईन गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2021 03:50 PM2021-02-14T15:50:57+5:302021-02-14T15:56:18+5:30

Wife gifts husband women photos he liked : नवऱ्यानं सोशल मीडियावर ज्या मुलींच्या फोंटोना लाईक केलं होतं. असे फोटो शोधून त्याची प्रिंट काढली आणि गिफ्ट दिलं आहे.  इतकंच नाही तर हे आगळं वेगळ गिफ्ट सोशल मीडियावर पोस्टसुद्धा केलं आहे.

Valentine day wife gifts husband women photos he liked on instagram | बोंबला! नवऱ्यानं ज्या महिलांच्या फोटोला लाईक केलं होतं; त्याची प्रिंट काढली अन् दिलं व्हॅलेंनटाईन गिफ्ट

बोंबला! नवऱ्यानं ज्या महिलांच्या फोटोला लाईक केलं होतं; त्याची प्रिंट काढली अन् दिलं व्हॅलेंनटाईन गिफ्ट

Next

सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या घटनेत एका पत्नीनं आपल्या  पतीला व्हॅलेंनटाईन डे चं अनोखं गिफ्ट दिलं आहे. तिच्या नवऱ्यानं सोशल मीडियावर ज्या मुलींच्या फोंटोना लाईक केलं होतं. असे फोटो शोधून त्याची प्रिंट काढली आणि गिफ्ट दिलं आहे.  इतकंच नाही तर हे आगळं वेगळ गिफ्ट सोशल मीडियावर पोस्टसुद्धा केलं आहे.

ग्लोरिया नावाची टिकटॉक युजर महिला अमेरिकेची रहिवासी आहे. तिने आपल्या पतीला आगळं वेगळे गिफ्ट देत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तिनं म्हटलं आहे की, 'आपला पती किंवा बॉयफ्रेंडला व्हॅलेंनटाईन डे ला काय गिफ्ट दिलं.'  या व्हिडीओला एकाच दिवसात एक कोटी ३८ लाखांपेक्षा जास्तवेळा पाहिलं गेलं आहे.

Valentine Day gifts

ग्लोरियानं सगळ्यात आधी लाईक केलेल्या मुलींचे फोटो इंस्टाग्रामवरून डाऊनलोड केले त्यानंतर हे फोटो प्रिंट केले आहेत. त्यानंतर या फोटोंना स्टिक करून वॅलेंनटाईन डे  गिफ्ट म्हणून पतीला दिलं आहे. 
ग्लोरियानं म्हटलं आहे की, प्रत्येकालाच आपल्या पार्टनरला गिफ्ट द्यायचं असतं. मीसुद्धा आपला क्यूट लिटिल बॉक्स पाहत आहे. सोशल मीडिया ग्लोरियावर कौतुकाचा वर्षाव होताना दिसून येत आहे. तसंच लोकांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्नही उपस्थित केले आहेत.  "Sorry Love, मी तुझं जेवण खाल्लं", Uber Eats च्या डिलिव्हरी बॉयने स्वत:च संपवली ऑर्डर अन्...

Valentine Day gifts

एका सोशल मीडिया युजरनं ग्लोरियाच्या या व्हिडीओवर कमेंट करताना  लिहिले आहे की,  तिनं आपल्या पतीची रिएक्शनसुद्धा पोस्ट करायला हवी होती. तर एकानं म्हटलं आहे की,  पतीला हे गिफ्ट नक्की आवडलं असेल.

एका युजरनं कमेंट केली आहे की पती इतर महिलांच्या फोटोला लाईक करू शकत नाही का? बरं झालं मी सिंगल आहे. पुढच्या व्हिडीओत ग्लोरियानं आपल्या पतीची रिएक्शनसुद्धा शेअर केली आहे.  पगार कपात केली; म्हणून बस कंडक्टरनं घर चालवण्यासाठी फेसबुकवर किडणी विकायची दिली जाहिरात

Web Title: Valentine day wife gifts husband women photos he liked on instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.