बॉयफ्रेन्डने गर्लफ्रेन्डला गणिताच्या भाषेत केलं प्रपोज, 'आय लव्ह यू' ऐवजी लिहिला 12.99999999 हा नंबर...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 03:59 PM2021-01-29T15:59:45+5:302021-01-29T16:03:14+5:30

उद्योगपती हर्ष गोयनका यांनी त्यांच्या ऑफिशिअल ट्विटर अकाउंटवर ही पोस्ट शेअर केली आहे. त्यांचं हे ट्विट लोकांना चांगलंच आवडतंय.

Valentines Day 2021 : Boyfriend proposes her girlfriend on mathematical way | बॉयफ्रेन्डने गर्लफ्रेन्डला गणिताच्या भाषेत केलं प्रपोज, 'आय लव्ह यू' ऐवजी लिहिला 12.99999999 हा नंबर...

बॉयफ्रेन्डने गर्लफ्रेन्डला गणिताच्या भाषेत केलं प्रपोज, 'आय लव्ह यू' ऐवजी लिहिला 12.99999999 हा नंबर...

googlenewsNext

(Image Credit : newidea.com.au)

प्रेमाचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे लवकरच येणार आहे. लवकरच व्हॅलेंटाईन वीकला सुरूवात होणार आहे. यादरम्यान सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल झाला आहे. ज्यात एक बॉयफ्रेन्डने त्याच्या गर्लफ्रेन्डला गणिताच्या भाषेत प्रपोज केलं आहे.  या अजब प्रपोजलला पाहून सोशल मीडियावरील लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

उद्योगपती हर्ष गोयनका यांनी त्यांच्या ऑफिशिअल ट्विटर अकाउंटवर ही पोस्ट शेअर केली आहे. त्यांचं हे ट्विट लोकांना चांगलंच आवडतंय. या पोस्टमध्ये त्यांनी सांगितलं की, एका मुलाने कशाप्रकारे गणित करून आपल्या गर्लफ्रेन्डला प्रपोज केलं. (हे पण वाचा : बॉयफ्रेंड नाही, तर व्हॅलेंटाईन डेपासून प्रवेश नाही; या कॉलेजचं लेटर व्हायरल)

हर्ष गोयनका यांनी जी पोस्ट शेअर केली आहे त्यात लिहिेले आहे की, 'एका गणितज्ञ तरूणाने त्याच्या गर्लफ्रेन्डला एक नोट पाठवली. या नोटमध्ये त्याने 12.9999999 असं लिहिलं होतं. हे आकडे पाहून मुलगी आधी हैराण झाली. नंतर जेव्हा ती आपल्या बॉयफ्रेन्डला भेटली तेव्हा तिने त्याला याचा अर्थ विचारला. तिने विचारले  या आकड्यांचा अर्थ काय आहे? यावर गणितज्ञ तरूण म्हणाला, 'तेरा होने लगा हूं'.

२६ जानेवारीला त्यांनी हे ट्विट केलं होतं. हे ट्विट अनेकांना आवडलं आहे. आतापर्यंत याला हजारो लाइक्स आणि शेकडो रिट्विट मिळाले आहेत. लोकांना त्यांचा हा जोक फारच फनी वाटला. इतकेच काय तर गायिका-अभिनेत्री सोफी चौधरीनेही त्यांच्या ट्विटचं कौतुक केलं. सोफी चौधरी म्हणाली की, हर्ष तुझे ट्विट फार चांगले असतात. ते वाचून चेहऱ्यावर हसू येतं.
 

Web Title: Valentines Day 2021 : Boyfriend proposes her girlfriend on mathematical way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.