“मी २० रुपयांचे मोमोज खातो आणि ती…” ‘वंशिका’च्या ब्रेकअप स्टोरीवर ‘बॉयफ्रेन्डचं’ उत्तर Viral

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2022 06:01 PM2022-12-10T18:01:37+5:302022-12-10T18:02:15+5:30

ट्विटरवर वंशिका आणि आकाश ट्रेंड करत होते. दोघांच्या ब्रेकअपनंतर आता बॉयफ्रेन्डनं तिलाच जबाबदार ठरवलं आहे.

vanshika-boyfriend-akash-reply-on-breakup-story-video-viral-twitter-trend-viral-audio-video-trending-story | “मी २० रुपयांचे मोमोज खातो आणि ती…” ‘वंशिका’च्या ब्रेकअप स्टोरीवर ‘बॉयफ्रेन्डचं’ उत्तर Viral

“मी २० रुपयांचे मोमोज खातो आणि ती…” ‘वंशिका’च्या ब्रेकअप स्टोरीवर ‘बॉयफ्रेन्डचं’ उत्तर Viral

Next

सोशल मीडियावर एक व्हिडिओ इतका व्हायरल झाला की ट्विटरवर 'वंशिका' (#Vanshika) हा हॅशटॅग ट्रेंड होऊ लागला. या व्हिडिओमध्ये एक मुलगी तिच्या मैत्रिणीला फोनवर तिच्या ब्रेकअपची कहाणी सांगताना रडत आहे. केवळ दोन महिन्यांच्या नात्यानंतर तिच्या प्रियकराने तिला कसे सोडले हे ती सांगत आहे. या काल्पनिक व्हिडिओला उत्तर म्हणून आता आणखी एक काल्पनिक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये 'बॉयफ्रेन्ड'ने दिलेले उत्तर दाखवण्यात आले आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मुलीचे नाव वंशिका आणि मुलाचे नाव आकाश आहे. नवीन व्हिडिओमध्ये 'वंशिका' प्रमाणेच 'आकाश' देखील त्याच्या मित्राशी ब्रेकअपबद्दल बोलत आहे. आकाश म्हणतो - ही मुलगी सगळ्या जगाला काय म्हणत आहे. तिच्या मागे पोरांची लाईन असायची तर करीना कपूर बनून सगळ्यांना नाकारायची काय गरज होती. जर कोणी दोन महिन्यांच्या नात्यासाठी लग्नाची तयारी करत असेल तर मी काय करावे?

या व्हिडीओमध्ये आकाशनं वंशिकाच्या महागड्या हिल्स खरेदीच्या वक्तव्यावरही आपली प्रतिक्रिया दिली. तिला सर्वच गोष्टींची माहिती असते पण सेलची माहिती नव्हती. आता तिच्या चुकीच्या शॉपिंगबद्दल मी काय करू? असं तो या व्हिडीओमध्ये म्हणताना दिसत आहे. फुटबॉल पाहण्याच्या वक्तव्यावरही आकाशनं म्हटलं, ती माझ्यासाठी मॅच पाहत नव्हती, तिला रोनाल्डो आवडतो म्हणून ती पाहत होती. यानंतर तो खाण्यापिण्यावरही उत्तर देतो. मी गल्लीतील २० रुपयांचे मोमोज खातो. परंतु ती ५०० रुपयांचे बिल भरायला लावते आणि पैसे वाचवण्याच्या गोष्टी करते. हद्दच झाली, ब्रेकअप तर होणारच होतं.



ब्रेकअपवर वंशिकानं काय म्हटलेलं?
यापूर्वी एका व्हायरल व्हिडीओमध्ये वंशिकाचं वक्तव्यही होतं. कॉलेजमध्ये माझ्यामागे मुलांची लाईन लागायची, परंतु याच्यासाठी मी सर्वांना रिजेक्ट केले. परंतु याने दोन महिन्यातच ब्रेकअप केलं, असं वक्तव्य असणारा तिचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आकाशसाठी आपण महागड्या हाय हिल्स खरेदी केल्या. सेलची वाटही पाहिली नाही. त्याच्यासाठी फुटबॉल मॅचही पाहायला सुरूवात केली. समजत नव्हतं तरी पाहिले, असेही तिनं व्हायरल व्हिडीओमध्ये म्हटले होते.





परंतु हे व्हिडीओ काल्पनिक असल्याचे दिसून येतेय. असे असले तरी सोशल मीडियावर मात्र वेगाने हे व्हिडीओ व्हायरल झाले.

Web Title: vanshika-boyfriend-akash-reply-on-breakup-story-video-viral-twitter-trend-viral-audio-video-trending-story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.