सलाम! प्रशासकीय अधिकाऱ्याची माणुसकी; गरीब भाजी विक्रेत्याकडून सगळा माल विकत घेतला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 02:01 PM2020-07-28T14:01:52+5:302020-07-28T14:07:12+5:30

या अधिकाऱ्याने  माणुसकी दाखवत महिलेची मदत केल्यामुळे सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.  

Vegetable seller refused to lockdown durg collector buy all vegetables and made her go home | सलाम! प्रशासकीय अधिकाऱ्याची माणुसकी; गरीब भाजी विक्रेत्याकडून सगळा माल विकत घेतला

सलाम! प्रशासकीय अधिकाऱ्याची माणुसकी; गरीब भाजी विक्रेत्याकडून सगळा माल विकत घेतला

googlenewsNext

कोरोना काळात लॉकडाऊनमध्ये अनेक प्रसंगातून माणसूकीचे दर्शन घडून आले तर काही असंवेदनशिल वर्तनाच्या घटनांनी मात्र अस्वस्थ केले. सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. डॉक्टर अजित वारवांडकर यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

या व्हिडीओला कॅप्शन असं दिलं आहे की, ज्यावेळी लॉकडाऊनचे नियम मोडत या भाजीवालीने रस्त्यावर भाजी विकण्यास सुरूवात केली. हे पाहून एका अधिकाऱ्याने या भाजीवाल्या महिलेच्या सगळ्या भाज्या विकत घेतल्या आणि घरी जाण्यास सांगितलं. सत्ता फक्त शक्तीचा वापर करण्यासाठी नाही तर  काही वेळा माणुसकी दाखवण्यासाठी सुद्धा कमी येऊ शकते. असा संदेश देणारी ही घटना आहे. 

माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ मे महिन्यातील लॉकडाऊन दरम्यानचा आहे. छत्तीसगडमधील दुर्ग भागातील एक महिलेने लॉकडाऊन असतानाही रस्त्यावर  भाजी विकण्याचा प्रयत्न केला. कारण पोट भरण्यासाठी भाजी विकून पैसे मिळवणं हा एकच मार्ग या महिलेकडे होता. अशा स्थितीत या अधिकाऱ्याने भाजी विकणाऱ्या महिलेची अडचण समजून घेऊन विक्रीसाठी असलेल्या सगळ्या भाज्या खरेदी केल्या. त्यानंतर या महिलेला घरी  जाण्यास सांगितले. 

ट्विटरवर या व्हिडीओला १६ हजारांपेक्षा डास्त लाईक्स मिळाले आहेत.  ४ हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर एकूण ३०८ कमेंट्स आल्या आहेत. या अधिकाऱ्याने  सहानुभूती दाखवत  महिलेची मदत केल्यामुळे सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.  

Coronavirus : 'या' बदलांसोबत आपलं रूप बदलत आहे कोरोना व्हायरस, घाबरण्याचं कारण आहे का?

कोविड19 वर स्वस्त उपचार शोधण्यात हा देश सगळ्यात पुढे; चाचणीदरम्यान 'या' औषधानं केली कमाल

Web Title: Vegetable seller refused to lockdown durg collector buy all vegetables and made her go home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.