Vial Video : कच्चा बादामनंतर आला 'लालमलाल टरबूज', व्हिडिओ पाहून पोट धरुन हसाल...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2022 03:42 PM2022-04-13T15:42:31+5:302022-04-13T15:51:00+5:30

Watermelon Seller Video: सध्या सोशल मीडियावर एका टरबूज विक्रेत्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. हा मजेशीर व्हिडिओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

Vial Video: 'Lalmalal Tarbuj' video viral on social media, you will laugh after seeing this | Vial Video : कच्चा बादामनंतर आला 'लालमलाल टरबूज', व्हिडिओ पाहून पोट धरुन हसाल...

Vial Video : कच्चा बादामनंतर आला 'लालमलाल टरबूज', व्हिडिओ पाहून पोट धरुन हसाल...

googlenewsNext

Watermelon Seller Video: बंगालच्या भुवन बंड्याकर याचे कच्चा बदाम गाणे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून अनेकजण आपला माल विकण्यासाठी विचित्र पद्धतींचे वापर करताना दिसत आहेत. कच्चा बदामनंतर कच्चा पेरू विकणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आता एका टरबूज विक्रेत्याचा मजेशीर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कच्चा बदामाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून विचित्र आणि उलटसुलट गाणी गाऊन व्हायरल होण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. दररोज अनेक प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पण, आता व्हायरल होत असलेला टरबूज विक्रेत्याचा व्हिडिओ इतर व्हिडिओंपेक्षा वेगळा आहे. टरबूज विकण्याचा असा प्रकार तुम्ही यापूर्वी कधीही पाहिला नसेल. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हिडिओत नेमकं काय ?

व्हिडिओमध्ये हा टरबूज विक्रेता रस्त्यावर गाडा लावून टरबूज विकताना दिसतोय. यावेळी तो मोठ्याने ओरडून 'लालम लाल टरबूज' असे म्हणताना दिसतोय. तसेच, चेहऱ्यावर विचित्र हावभावही करतोय. त्याला अशा अवस्थेत पाहून, तो दारुच्या नशेत आहे का, असे वाटेल. लहान मुलेही त्याला अशा अवतारात पाहून घाबरतील. पण, हा व्हिडीओ बघायला इतका मजेशीर आहे की, बघितल्यावर तुम्हालाही हसू आवरणार नाही.

नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स
हा अनोखा व्हिडिओ इंस्टाग्रामवर giedde नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला कॅप्शन दिले आहे - उन्हाळ्याचे लालम लाल टरबूज. या व्हिडिओला जवळपास 5 हजार लाइक्स मिळाले असून तो पाहणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. याबाबत लोक आपापल्या प्रतिक्रियाही देत ​​आहेत. 
 

Web Title: Vial Video: 'Lalmalal Tarbuj' video viral on social media, you will laugh after seeing this

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.