Video : एस्केलेटरमध्ये फसला चिमुकलीचा हात, बघा कशी केली सुटका!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 04:10 PM2019-08-20T16:10:32+5:302019-08-20T16:10:48+5:30
हा व्हिडीओ तुम्हाला विचलित करू शकतो. चीनमधील घटनेचा धक्कादायक व्हिडीओ.
वेगवेगळ्या मॉल्समध्ये अनेकजण एस्केलेटर म्हणजेच स्वयंचलित पायऱ्यांचा वापर करतात. अनेकजण जर उत्साहाच्या भरात त्यावर स्टंटही करतात. इतकेच नाही तर अनेकजण सोबत आणलेल्या लहान मुलांकडेही यावरून जाताना फार लक्ष देत नाहीत. त्यांच्यासाठीच हा व्हिडीओ आहे. घटना चीनची आहे. इथे एका मॉलमध्ये ५ वर्षीय मुलीचा हात एक्सेलेटर फसला. कुणीतरी या घटनेचा व्हिडीओ काढला आणि आता हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. पण हे दृश्य तुम्हाला विचलित करू शकतं.
रिपोर्ट्नुसार, ही घटना चीनच्या मध्य हुबेई प्रांतातील हेंचुआन शहरातील आहे. लहान मुलगी आईसोबत एस्केलेटरच्या मदतीने खाली उतरत होती. दरम्यान, मुलीचा हात हॅंडरेलवर होता. पायऱ्यांवरून उतरल्यावरही तिने तिचा हात हॅंडरेलवरून काढला नाही, ज्यामुळे हात खालच्या दिशेने गेला आणि फसला.
एस्केलेटरमध्ये हात फसल्याने मुलगी ओरडू लागली. तिच्या आईने आरडा-ओरड केल्यावर लोक जमा झाले. एकाने समजूतदारपणा दाखवत एस्केलेटर बंद केलं. १० मिनिटांनी फायर सर्व्हिसचे लोक आले आणि त्यांनी मुलीचा हात एस्केलेटरमधून बाहेर काढला.
आश्चर्याची बाब म्हणजे मुलीच्या समोर मोबाइलवर व्हिडीओ प्ले करून दिला, जेणेकरून तिचं सतत हाताकडे लक्ष जाऊ नये. सुदैवाने मुलीला गंभीर जखम झाली नाही. पण थोडं कापल्याने तिच्या हातावर काही टाके लागले.