VIDEO: साडी घालून 56 वर्षीय महिलेचा जिममध्ये व्यायम; व्हिडिओ पाहून तुम्हीही कराल कौतुक...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2022 05:47 PM2022-11-20T17:47:03+5:302022-11-20T17:49:24+5:30

VIDEO: इंस्टाग्रामवर नेटकऱ्यांनी आतापर्यंत 13 लाख वेळा हा व्हिडिओ पाहिला आहे.

VIDEO: 56-year-old woman exercises in gym wearing saree; You will also appreciate watching the video | VIDEO: साडी घालून 56 वर्षीय महिलेचा जिममध्ये व्यायम; व्हिडिओ पाहून तुम्हीही कराल कौतुक...

VIDEO: साडी घालून 56 वर्षीय महिलेचा जिममध्ये व्यायम; व्हिडिओ पाहून तुम्हीही कराल कौतुक...

googlenewsNext


आपले शरीर फिट असावे, असे कोणाला वाटणार नाही...परंतू वाढत्या वयामुळे अनेकांना फिट राहणे जमत नाही. जसं जसं वय वाढतं जातं, तसं तसं हाडं कमजोर होत जातात. अशा परिस्थितीत वजन उचलणे लाबंच, पण चालणे-फिरणेही अवघड होते. परंतू, जगात अनेक असे लोक आहेत, ज्यांच 50 वय झालं तरीदेखील जिममध्ये जाऊन स्वतःला फिट ठेवतात. 

भारतातील जिममध्ये तुम्हाला तारुण्यावस्थेतील मुलं-मुली दिसतील. क्वचितच कुणी 50 वय झालेला व्यक्ती जिममध्ये दिसले. महिला तर फार कमी प्रमाणात जिममध्ये जातात. पण, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्यात एक 56 वर्षीय महिला तरुणांप्रमाणे जिममध्ये व्यायाम करताना दिसत आहे. या महिलेला पाहून, तुम्हीही म्हणला, मेहनत आणि वयाचा संबंध नसतो. 

 

विशेष म्हणजे ही 56 वर्षीय महिला आपल्या सुनेसोबत जिममध्ये व्यायाम करते. व्हिडिओमध्ये चेन्नईची रहिवासी महिला साडी घालून जिममध्ये व्यायाम करताना दिसत आहे. ती अतिशय चांगल्या पद्धतीने जिममधील मशीन आणि इतर उपकरणांवर व्यायाम करताना दिसत आहे. व्हिडिओच्या शेवटी जिममधील स्टाफही महिलेच्या मेहनतीचे कौतुक करताना दिसतो. 

मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला 52व्या वर्षापासून जिममध्ये जाते. तिला गुडघ्याचा त्रास होता, पण जिममध्ये व्यायाम सुरू केल्यापासून तिचा त्रास दूर झाला. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामऴर humansofmadrasoffl नावाच्या अकाउंटवरुन महिलेचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 13 लाख वेळा पाहिला असून, 84 हजारांपेक्षा जास्त लोकांनी लाइक केला आहे.
 

Web Title: VIDEO: 56-year-old woman exercises in gym wearing saree; You will also appreciate watching the video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.