आजोबांनी कमाल केली, 14 सेकंदात धावण्याची शर्यत जिंकली; तुफान व्हायरल होणारा Video पाहिलात का?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 05:09 PM2022-05-03T17:09:45+5:302022-05-03T17:24:28+5:30
Video : एका 70 वर्षीय व्यक्तीने वाऱ्याच्या वेगाने धावून अवघ्या 14 सेकंदात स्पर्धा पूर्ण केली आहे. मायकेल किश असं या 70 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे.
सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ हे जोरदार व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ आता समोर आला आहे. तो पाहून तुम्ही वय फक्त एक आकडा आहे असं हमखास म्हणाल. खरं तर माणसाची विचारसरणी त्याला वृद्ध आणि तरुण बनवते. एखादी गोष्ट करायची इच्छा असेल तर माणूस काहीही करू शकतो याचा अंदाज हा व्हायरल व्हिडीओ पाहून लावता येतो. एका 70 वर्षीय व्यक्तीने वाऱ्याच्या वेगाने धावून अवघ्या 14 सेकंदात स्पर्धा पूर्ण केली आहे. मायकेल किश असं या 70 वर्षीय व्यक्तीचं नाव आहे.
मायकेल किश यांनी 14 सेकंदांपेक्षा कमी वेळेत 100 मीटरची शर्यत जिंकली आणि सर्वांनाच थक्क केलं आहे. इंटरनेटवर दररोज एकापेक्षा एक व्हिडीओ व्हायरल होतात, ज्यात काही हृदयाला स्पर्श करतात तर काही थक्क करणारे असतात. त्याच वेळी, यातील बहुतेक व्हिडीओ प्रेरणादायी आहेत. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक 70 वर्षीय व्यक्ती 14 सेकंदांपेक्षा कमी वेळेत 100 मीटरची शर्यत पूर्ण करताना दिसत आहे, जो पाहून सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत.
Michael Kish wins Penn Relays 70-year-old 100m race in 13.47!! 🤯
— FloTrack (@FloTrack) April 28, 2022
📺: https://t.co/PVPuMyyitJpic.twitter.com/Cyrn2toBDa
70 वर्षीय मायकल किश वाऱ्याच्या वेगाने धावून शर्यत जिंकत असल्याचा व्हिडीओ फ्लोट्रॅक नावाच्या ट्विटर अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना, 'मायकल किश यांनी पेन रिले 100 मीटर शर्यत 13.47 सेकंदामध्ये जिंकली' असं कॅप्शन लिहिलं आहे. आतापर्यंत 1.9 मिलियनहून अधिक लोकांना हा व्हि़डीओ पाहिला आहे. सध्या सर्वत्र याचीच चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.