VIDEO: अॅडव्हेंचर गेम जीवावर बेतला; 40 फूट उंचीवरुन पडून 6 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 06:26 PM2023-06-30T18:26:22+5:302023-06-30T18:27:09+5:30

Shocking Video: हा व्हिडिओ पाहून तुम्हीही अॅडव्हेंचर स्पोर्ट्स करण्यापूर्वी दहावेळा विचार कराल.

VIDEO: Adventure game ends life; A 6-year-old boy died after falling from a height of 40 feet | VIDEO: अॅडव्हेंचर गेम जीवावर बेतला; 40 फूट उंचीवरुन पडून 6 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

VIDEO: अॅडव्हेंचर गेम जीवावर बेतला; 40 फूट उंचीवरुन पडून 6 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू

googlenewsNext

Shocking Video: जगात अनेक असे लोक आहेत, ज्यांना अॅडव्हेंचर स्पोर्ट्सची आवड आहे. अॅडव्हेंचर करण्यासाटी काहीजण कुठल्याही थराला जाऊ शकतात. पण, कधी-कधी हेच अॅडव्हेंचर जीवावच बेतू शकते. अशीच एक घटना 6 वर्षीय मुलासोबत घडली आहे. सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. 

उंच डोंगरांवर चढणे, उडी मारणे, पॅराग्लायडिंग, बंजी जंपिंग, अशाप्रकारचे अॅडव्हेंचर स्पोर्ट्स खूप लोकप्रिय आहेत. जगभरात अनेक ठिकाणी अशाप्रकारचे साहसी खेळ खेळले जातात. अशाच एका खेळात मुलाचा जीव गेला आहे. एक मुलहा जिप लाइन अॅडव्हेंचर करत होता, यासाठी तो एका दोरीला लटकला आणि पुलीच्या सहाय्याने पुढे गेला. त्याच्या मागून एक मोठा माणूसही निघतो. ते त्याचे वडील असावेत. 

सुरुवातीला सर्वकाही ठीक सुरू होते, पण काही वेळानंतर मुलाच्या अंगाला बांधलेली दोरी अचानक तुटते. यामुळे मुलगा खाली पडतो आणि त्यात त्याचा मृत्यू होतो. जमिनीपासून जिप लाईनची उंची 40 फूट होती. इतक्या उंचावरुन पडल्यामुळे त्या चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागला. हा धक्कादायक व्हिडिओ मेक्सिकोच्या मॉन्टेरीमधील एका पार्कचा आहे. 

Web Title: VIDEO: Adventure game ends life; A 6-year-old boy died after falling from a height of 40 feet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.