Video - आईने लेकीला रेस्टॉरंटमध्ये बॉयफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने बेदम मारलं अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2023 11:47 AM2023-02-20T11:47:23+5:302023-02-20T11:47:44+5:30

इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये रागाच्या भरात एक महिला रेस्टॉरंटमध्ये घुसली आणि मुलीला मारायला लागली. 

Video angry mother beats her daughter with slipper sitting with boyfriend in restaurant | Video - आईने लेकीला रेस्टॉरंटमध्ये बॉयफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने बेदम मारलं अन्...

Video - आईने लेकीला रेस्टॉरंटमध्ये बॉयफ्रेंडसोबत रंगेहाथ पकडलं, चपलेने बेदम मारलं अन्...

Next

व्हॅलेंटाईन डे नुकताच पार पडला आणि गेल्या काही दिवसांचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर दररोज व्हायरल होत आहेत. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी कपल्स बाहेर फिरायला जातात आणि एन्जॉय करतात. काहीजण गार्डनमध्ये जाऊन किंवा चित्रपट पाहून दिवस घालवतात, तर काहीजण जेवायला रेस्टॉरंटमध्ये जातात. यासंबंधीचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडीओमध्ये रागाच्या भरात एक महिला रेस्टॉरंटमध्ये घुसली आणि मुलीला मारायला लागली. 

रागाच्या भरात आईने रेस्टॉरंटमध्ये घातला गोंधळ 

रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करताच आई संतापते. वेळ न घालवता चप्पल काढते आणि मारायला लागते. रेस्टॉरंटमध्ये बॉयफ्रेंडसोबत असलेल्या लेकीला पाहून ती चिडते. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक खिल्ली उडवत असले तरी ज्याच्यासोबत हा प्रकार घडतो त्याच्यासाठी ही लाजिरवाणी गोष्ट आहे. हा व्हिडिओ पाकिस्तानी पत्रकार आरजू काजमिलने शेअर केला आहे. यासोबत "देसी पालक" असं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. 

व्हिडिओ पाहिल्यानंतर एका ट्विटर युजरने लिहिले की, "पालक आपल्या मुलांना अफेअरबद्दल जाणून घेण्याऐवजी मारहाण करण्यास सुरुवात करतात." दुसऱ्या युजरने लिहिले की, "काकूनी मुलीच्या व्हॅलेंटाईन डे खराब केला." या व्हिडिओवर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. याला आतापर्यंत 3 लाख 74 हजारांहून अधिक वेळा पाहण्यात आले असून हजारो लाईक्स आले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
 

Web Title: Video angry mother beats her daughter with slipper sitting with boyfriend in restaurant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.