Video: चहासाठी काय पण..! भररस्त्यात ड्रायव्हरने थांबवली बस, ट्रॅफिकमध्ये लोकांची बोंबा-बोंब...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 04:21 PM2023-01-02T16:21:39+5:302023-01-02T16:22:15+5:30

ट्रॅफिकमध्ये बस थांबवून ड्रायव्हर गेला चहा प्यायला; Video व्हायरल

Video: anything for tea..! Bus driver stopped the bus and went for tea | Video: चहासाठी काय पण..! भररस्त्यात ड्रायव्हरने थांबवली बस, ट्रॅफिकमध्ये लोकांची बोंबा-बोंब...

Video: चहासाठी काय पण..! भररस्त्यात ड्रायव्हरने थांबवली बस, ट्रॅफिकमध्ये लोकांची बोंबा-बोंब...

googlenewsNext

Driver Stop The Bus: भारतासह जगभरात अनेक चहाप्रेमी आहेत. चहावर आतापर्यंत अनेकांनी कविता, शायरी लिहिलेल्या आहेत. चहाप्रेमी चहा पिण्यासाठी काहीही करायला तयार असतात. कधी ते आवडता चहा पिण्यासाठी दूरवर जातात, भर रस्त्यात गाडी थांबवून चहाची टपरी गाठतात. अशाच प्रकारचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

बस ड्रायव्हरला चहाची 'तलफ'
सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ एका बस ड्रायव्हरचा आहे. ट्विटरवर शुभ नावाच्या युजरने हा व्हिडओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये एक चहाप्रेमी बस ड्रायव्हर टपरीवर चहा पिण्यसाठी चक्क ट्रॅफिकमध्ये बस थांबवतो. ही बस डीटीसी म्हणजेच दिल्लीतील आहे. भररस्त्यात बस थांबवून ड्रायव्हर चहाचा आनंद लुटतो. यावेळी रस्त्यावरील कुणीतरी त्याचा व्हिडिओ काढून सोशल मीडियावर पोस्ट केला.

व्हिडिओवर विविध प्रतिक्रिया
चहा पिल्यानंतर तो ड्रायव्हर बसमध्ये बसून निघून जातो. हा व्हिडिओ कधीचा आणि कुठला आहे, याबाबत ठोस माहिती समोर आलेली नाही. परंतू, काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, हा दिल्ली यूनिव्हर्सिटी परिसरातील एका प्रसिद्ध चहावाल्याच्या दुकानाजवळील व्हिडिओ आहे. या व्हिडिओवर युजर विविध प्रतिक्रिया देत आहेत.

Web Title: Video: anything for tea..! Bus driver stopped the bus and went for tea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.