Video: डोनाल्ड ट्रम्प यांनी शेअर केला 'बाहुबली'चा व्हीडिओ; मोदींनी वाटले पेढे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2020 11:04 AM2020-02-23T11:04:15+5:302020-02-23T11:09:11+5:30
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24-25 फेब्रुवारी रोजी भारत दौर्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी बाहुबली चित्रपटाच्या थीमवरील व्हायरल व्हिडिओ रिट्वीट केला.
वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24-25 फेब्रुवारी रोजी भारत दौर्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी बाहुबली चित्रपटाच्या थीमवरील व्हायरल व्हीडिओ रिट्वीट केला. यात ते अमरेंद्र बाहुबलीच्या भूमिकेत दिसले आहेत. या व्हीडिओमध्ये त्यांच्यासोबत पत्नी मेलेनिया, मुलगी इव्हांका आणि मुलगाही दाखविण्यात आले आहेत. ट्रम्प यांनी हा व्हिडीओ सॉल्मेम्स 1 नावाच्या ट्विटर हँडलसह पोस्ट केला आहे. यावर ट्रम्प यांनी प्रतिक्रिया देत मी भारतातील मित्रांना भेटण्यास उत्साहित आहे, असे म्हटले आहे.
बाहुबली चित्रपटाच्या व्हीडिओमध्ये वेगवेगळे सीन दाखविण्यात आले आहेत. रणांगणापासून सुरूवात करण्यात आली असून प्रभासच्याजागी ट्रम्प यांचा चेहरा मॉर्फ करण्यात आला आहे. जो माहिष्मती साम्राज्याच्या रक्षणासाठी रणांगणात तलवारी, धनुष्य घेऊन लढताना दिसत आहे. दुसऱ्या क्षणामध्ये ट्रम्प यांची पत्नी मेलेनिया आणि मुलगी इव्हांकाला दाखविण्यात आले आहे. तर पुढील दृष्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्रम्प यांच्या स्वागतासाठी माहिष्मतीच्या प्रजेला मिठाई वाटताना दिसत आहेत. हा व्हीडिओ सोशल मिडीयावरही कमालीचा व्हायरल होत आहे. काही तासांत 6 लाख वेळा शेअर झाला आहे.
Look so forward to being with my great friends in INDIA! https://t.co/1jdk3AW6fG
— Donald J. Trump (@realDonaldTrump) February 22, 2020
हा व्हीडिओ व्हायरल करणार्या सॉल्मेम्स 1 ने आपल्या ट्विटर बायोमध्ये स्वत: ला पुरस्कारप्राप्त मेमेटिशियन म्हणून घोषित केलेले आहे. ते जीएफवाय युनिव्हर्सिटीमध्ये मिमॉलॉजीचे प्रोफेसर आहेत. ते म्हणाले की ही माझी स्वतःची विचारसरणी आहे. याचा कोणाच्या वास्तविक जीवनाशी काही संबंध नाही. यापूर्वी 23 जानेवारीला त्यांनी आणखी एक 93-सेकंदाचा 'जियो रे बहु ट्रम्प' व्हिडिओ बनविला आहे. ज्यामध्ये मेलानिया साडी नेसलेल्य़ा दिसत होत्या.