Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 09:44 PM2024-09-23T21:44:55+5:302024-09-23T21:46:45+5:30

सोशल मीडियावर या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Video: Bapre! The python mauled the woman, struggled to the death for two hours, and it was difficult to breathe; Finally... | Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...

Video: बापरे! अजगराचा महिलेला विळखा, दोन तास मृत्यूशी झुंज, श्वास घेणेही कठीण; अखेर...

Viral Python Video : अजगराची जगातील सर्वात धोकादायक प्राण्यांमध्ये गणना केली जाते. अजगर असा प्राणी आहे, जो आपल्या भक्ष्याला आधी विळखा घालतो आणि नंतर जिवंत गिळतो. प्राणी असो वा माणूस, अजगराच्या तावडीत सापडल्यावर सुटका करणे जवळजवळ अशक्य काम आहे. पण, एका महिलेने मोठे शौर्य दाखवत दोन तास अजगराशी झुंज दिली आणि त्याच्या तावडीतून स्वतःची सुटका करुन घेतली आहे. 

अजगराचा महिलेच्या शरीराला विळखा
सध्या सोशल मीडियावर एका महिलेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय, ज्यात एका महाकाय अजगराने त्या महिलेला आपले भक्ष बनवण्यासाठी विळखा घातल्याचे दिसत आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अजगर महिलेच्या संपूर्ण शरीराभोवती गुंडाळलेला आहे. तो महिलेचा श्वास बंद करण्यासाठी पूर्ण जोर लावतोय, तर महिलादेखील मोठ्या शौर्याने त्याचा सामना करत आहे. ती अजगराच्या तावडीतून स्वतःची सुटका करुन घेण्याचा प्रयत्न करतीये. शेवटी बचाव पथकाने महिलेची अजगराच्या तावडीतून पूर्णपणे सुटका केली.

थायलंडमध्ये घडलेली घटना 
व्हिडिओमध्ये दिसणारी महिला थायलंडची असून तिचे नाव अरोम अरुणरोज (वय 64 ) आहे. महिलेने स्थानिक प्रसारमाध्यमांना सांगितले की, ती स्वयंपाकघरात भांडी धूत बसली होती, त्यावेळी अचानक अजगराने तिच्यावर हल्ला केला आणि विळखा घातला. तिने अजगरापासून स्वत:ला सोडवण्याचा खूप प्रयत्न केला, पण अजगराने तिला अशा प्रकारे पकडले होते की, तिला उभेही राहता येत नव्हते. हळूहळू अजगराने आपली पकड इतकी घट्ट केली की, महिलेला हालचाल करणे कठीण झाले. ती दरवाजाजवळ पडून राहिली.

बचाव पथकाने केली सुटका 
महिलेचा आरडाओरडा ऐकून शेजाऱ्यांनी मदतीसाठी तिचे घर गाठले. शेजाऱ्यांनी ताबडतोब अधिकाऱ्यांना फोन करून आपत्कालीन पथकाला महिलेच्या घरी बोलावले. काही वेळातच रेस्क्यू टीम महिलेपर्यंत पोहोचली. टीम पोहोचली, तेव्हा त्यांनी पाहिले की अजगराने महिलेचा गळा दाबला होता आणि तिला श्वास घेण्यासही त्रास होत होता. अशा स्थितीत टीमने आधी अजगराचे तोंड पकडले आणि नंतर हळूहळू महिलेची सुटका केली. महिलेला वाचवण्यासाठी टीमला किमान 2 तास लागले. या घटनेत महिलेला किरकोळ दुखापत झाली. 

Web Title: Video: Bapre! The python mauled the woman, struggled to the death for two hours, and it was difficult to breathe; Finally...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.