शाब्बास पोरी! आईचा जीव वाचवण्यासाठी लेक झाली 'बाहुबली'; धावत आली अन् केलं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 09:29 AM2024-09-10T09:29:56+5:302024-09-10T09:40:29+5:30

Video - आईचा अपघात झाल्यावर मुलगी घाबरली नाही. तर आईचा जीव वाचवण्यासाठी धडपड करत होती. 

video brave school girl in mangaluru turns auto to save mother crushed under | शाब्बास पोरी! आईचा जीव वाचवण्यासाठी लेक झाली 'बाहुबली'; धावत आली अन् केलं असं काही...

शाब्बास पोरी! आईचा जीव वाचवण्यासाठी लेक झाली 'बाहुबली'; धावत आली अन् केलं असं काही...

सोशल मीडियावर रोज नवनवीन व्हिडीओ हे व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ आता तुफान व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. आपल्या आईला वाचवण्यासाठी लेक बाहुबली झाली. लेकीच्या या धाडसाचं आता सर्वत्र कौतुक होत आहे. आईचा अपघात झाल्यावर मुलगी घाबरली नाही. तर आईचा जीव वाचवण्यासाठी धडपड करत होती. 

मिळालेल्या माहितीनुसार, एक महिला रस्ता क्रॉस करत असते. त्याच वेळी तिला रिक्षा धडकते. काही अंतरावर या महिलेची मुलगी देखील उपस्थित असते. मुलीसमोर तिच्या आईचा अपघात झाला, त्यानंतर मुलीने तिचा जीव वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. अपघाताच्या वेळी हिंमत आणि प्रसंगावधान आपल्या जवळच्या व्यक्तीचा जीव कसा वाचवू शकतं हे या मुलीने दाखवून दिलं आहे. 

आईचा अपघात झाल्याचं दिसताच मुलगी वेगाने धावत आली आणि रिक्षाखाली अडकलेल्या आईला वाचवण्यासाठी एकटीने रिक्षा उचलली. मंगळूरुच्या रामनगर भागात ही घटना घडली आहे. आई आपल्या मुलीला ट्यूशनवरून परत घेण्यासाठी आली होती. पण रस्ता ओलांडतात असताना भरधाव वेगात आलेल्या रिक्षाने महिलेला जोरात धडक दिली. 

अपघात झाला त्या रिक्षामध्ये काही लोक देखील बसले होते. ते लोक पुन्हा रिक्षा सरळ करण्याचा प्रयत्न करतात. तसेच रस्त्यावर असलेली लोकही मदतीसाठी पुढे येतात. मुलगी तिच्या आईला धीर देण्याचा प्रयत्न करते. ही संपूर्ण घटना तिथे लावलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. आणि त्यानंतर हाच व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये लोक मुलीचं भरभरून कौतुक करत आहेत. 
 

Web Title: video brave school girl in mangaluru turns auto to save mother crushed under

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.