Video : वृद्ध आईला रस्त्यावरून खेचून मुलाने केली मारहाण; कुत्र्याने वाचवला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 04:27 PM2021-08-23T16:27:18+5:302021-08-23T16:27:52+5:30

Elderly mother dragged off road and beaten by son : मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना तमिळनाडूच्या नामक्कल शहरातील आहे.

Video: Elderly mother dragged off road and beaten by son; The dog saved the life | Video : वृद्ध आईला रस्त्यावरून खेचून मुलाने केली मारहाण; कुत्र्याने वाचवला जीव

Video : वृद्ध आईला रस्त्यावरून खेचून मुलाने केली मारहाण; कुत्र्याने वाचवला जीव

Next
ठळक मुद्दे. पतीच्या मृत्यूनंतर ही महिला पोन्नेरिपट्टीमध्ये एकटीच राहत होती. आपल्या आईला ओढत घेऊन जाणाऱ्या या व्यक्तीचं नाव षण्मुगम असल्याचं समोर आलं आहे. नल्लम्मल यांच्याकडे एक पाळीव कुत्रा आहे. 

आई मुलाच्या नात्याला काळिमा फासणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ तामिळनाडूतील आहे. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती वृद्ध महिलेला अमानुषपणे रस्त्यावरुन ओढत ओढत मारताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये ही महिला मोठमोठ्यानं आक्रोश करताना दिसतेय. एका ट्विटमध्ये या महिलेला रस्त्यावरून ओढत नेणारा व्यक्ती तिचा मुलगा असल्याचं नमूद केलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना तमिळनाडूच्या नामक्कल शहरातील आहे. यात एका मुलानं पैशासाठी अमानुषपणाच्या सर्व परिसीमा पार केल्याचं पाहायला मिळते आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये हा मुलगा आपल्याच आईला मारत आहे आणि रस्त्यावरून ओढत घेऊन जात आहे. या महिलेचं नाव मालकीन नल्लम्मल असं आहे. पतीच्या मृत्यूनंतर ही महिला पोन्नेरिपट्टीमध्ये एकटीच राहत होती. आपल्या आईला ओढत घेऊन जाणाऱ्या या व्यक्तीचं नाव षण्मुगम असल्याचं समोर आलं आहे. नल्लम्मल यांच्याकडे एक पाळीव कुत्रा आहे. षण्मुगम आपल्या मालकीणीला मारहाण करत असल्याचं पाहून तो तिला वाचवण्यासाठीमध्ये आला. कुत्रा षण्मुगमवर धावून गेला आणि आपल्या मालकीणीला मारहाणीपासून वाचवण्याचा प्रयत्न केला. या व्हिडिओमध्ये नल्लम्मल यांना वाचवण्यासाठी त्यांचा कुत्रा षण्मुगमला नल्लम्मलपासून दूर नेट आहे. नंतर षण्मुगम  देखील कुत्र्याच्या भीतीनं आपल्या आईला ओढणं आणि मारहाण करणं बंद करतो.

 

Web Title: Video: Elderly mother dragged off road and beaten by son; The dog saved the life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.