सलूनमधील केसांचं पुढे काय होतं? व्हिडीओ बघून व्हाल अवाक्...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 12:12 PM2024-01-17T12:12:59+5:302024-01-17T12:13:40+5:30
तुम्हालाही अनेकदा हा प्रश्न पडत असेल की, सलूनमध्ये जे तुमचे केस कापले जातात त्यांचं नंतर काय होतं?
Viral Video of Hair Recycling : सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. यात अनेक वेगवेगळ्या गोष्टी बघायला मिळतात ज्याबाबत आपल्या आधी माहीत नसतं. असाच एक व्हिडीओ सध्या इन्स्टावर व्हायरल झाला आहे. ज्यात तुम्ही बघू शकता की, सलूनमध्ये जे केस जमा होतात त्यांचं काय केलं जातं.
तुम्हालाही अनेकदा हा प्रश्न पडत असेल की, सलूनमध्ये जे तुमचे केस कापले जातात त्यांचं नंतर काय होतं? तेच तुम्हाला या व्हिडिओत बघायला मिळत आहे. या केसांवर प्रोसेस करण्याची पूर्ण प्रक्रिया या व्हिडिओत बघायला मिळते. व्हिडिओत स्टेप बाय स्टेप दाखवण्यात आलं आहे की, केसांना कसं रिसायकल केलं जातं आणि त्यांपासून विग बनवले जातात.
कसे रिसायकल होतात केस?
व्हायरल झालेल्या व्हिडिओत तुम्ही बघू शकता की, केस एका पोत्यात भरून नेले जातात. मग त्यांना वेगळे करून एका ठिकाणी ठेवले जातात. मग एका मोठ्या कंगव्याव्दारे ते मोकळे केले जातात. त्यानंतर केस चमकदार करून छोटे छोटे गुच्छे बनवले जातात. केसांच्या लांबीनुसार, त्यांचे गुच्छे बनवले जातात. जे नंतर विग आणि हेअर एक्सटेंशनमध्ये बदलले जातात.
व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर ourcollecti0n नावाच्या अकाउंटने हा शेअर केला. आतापर्यंत या व्हिडिओला 12 मिलियन म्हणजे 1.2 कोटी लोकांनी पाहिलंय. तर 97 हजारांपेक्षा जास्त लोकांनी व्हिडिओला लाइक केलं आहे.