Video: अपंग आहे पण भीक मागून खाणार नाही…व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2024 08:53 PM2024-01-07T20:53:03+5:302024-01-07T20:55:08+5:30
व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
Viral Video: अपंगत्व कुणासाठीही मोठा शाप आहे. अपंग व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन गोष्टी करण्यातही मोठ्या अडचणी येतात. अपंगत्व विविध प्रकारचे असते. कुणाला हात नसतात तर कुणाला पाय नसतात. ज्यांना पाय नाही असे काही लोक रस्त्यावर भीक मागताना दिसतात, तर काही लोक सर्वसामान्यांप्रमाणे कष्ट करून आयुष्य जगण्याचा निर्णय घेतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून लोक भावूकही झाले आहेत.
या व्हिडिओमध्ये दोन मजूर टोपल्याने खडी उचलण्याचे काम करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे ते दोघेही अपंग आहे. त्या दोघांनाही एकच पाय असून, कुबड्यांच्या मदतीने चालताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक व्यक्ती खडीने भरलेली टोपली दुसऱ्याच्या डोक्यावर उचलून देतो, त्यानंतर तो खडी घेऊन मशीनमध्ये टाकतो.
भीख मांगकर खुद को मोहताज नहीं बनाऊंगा, विकलांग जरूर हूं मगर कमाकर खाऊंगा 👌🙏https://t.co/3RlyMtIRFVpic.twitter.com/Qw8cuH3zmy
— Dilpreet kaur (@dilsarkaria) January 7, 2024
हा अप्रतिम व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @dilsarkaria नावाच्या आयडीवरुन शेअर करण्यात आला आहे. 'मी अपंग आहे, पण भीक मागून खाणार नाही' असे कॅप्शन व्हिडिओला लिहिले आहे. अवघ्या 25 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 4 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे, तर 10 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईकही केले आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर युजर्सनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. युजर्स या दोन्ही मजुरांना सलाम करत आहेत.