Video: नवरा कामावरुन घरी परतला, बायकोने लाथा-बुक्क्यांनी केली मारहाण, कारण काय..?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2023 17:10 IST2023-05-07T16:43:32+5:302023-05-07T17:10:45+5:30
हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

Video: नवरा कामावरुन घरी परतला, बायकोने लाथा-बुक्क्यांनी केली मारहाण, कारण काय..?
Viral Video:नवरा-बायकोचे अनेकदा भांडण होत असतात, हे भांडण कधीकधी टोकाला पोहोचते. अशाच एका भांडणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. पण, हा व्हिडिओ इतर व्हिडिओंपेक्षा वेगळा आहे, कारण यात बायको नवऱ्याची धु-धु धुलाई करताना दिसत आहे. या व्हिडिओवर लोक खूप कमेंट करत आहेत.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती कामावरुन(ऑफिसमधून) घरी येतो, यावेळी अचानक त्याची बायको त्याच्यावर तुटून पडते. ती त्याला लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करते. ही संपूर्ण घटना घरात लावलेल्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मारहाणीसह महिला त्याला शिवीगाळही करते. हा व्हिडिओ ट्विटरवर Crazy Clips नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.
Wife beats husband immediately after he gets home pic.twitter.com/I32rzrKoQa
— Crazy Clips (@crazyclipsonly) May 6, 2023
व्हिडिओला 5.78 लाखांहून अधिक व्हू मिळाले आहेत. व्हिडिओमध्ये 29 जानेवारी 2023 ही तारीख दिसत आहे. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असे सांगण्यात आले आहे की, ही व्यक्ती 14 तासांच्या शिफ्टमध्ये काम करून घरी परतली होती. तो घरचा कचरा उचलायला विसरला म्हणून पत्नीने त्याला मारहाण केली. हा व्हिडीओ कुठला आहे हे कळू शकलेले नाही.