Video : ....अन् भर रस्त्यात महिलेनं वॉचमनला चपलेनं चांगलाच चोप दिला; व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 03:07 PM2020-08-26T15:07:23+5:302020-08-26T15:37:54+5:30

पोलिसांनी या वॉचमनबाबत तक्रार दाखल करून घेतली आहे. कोर्टाकडून परवानगी मिळाल्यानंतर आता केस दाखल केली जाणार आहे. 

Video: Hyderabad woman assaults watchman for stopping her car video viral |  Video : ....अन् भर रस्त्यात महिलेनं वॉचमनला चपलेनं चांगलाच चोप दिला; व्हिडीओ व्हायरल

 Video : ....अन् भर रस्त्यात महिलेनं वॉचमनला चपलेनं चांगलाच चोप दिला; व्हिडीओ व्हायरल

Next

रस्त्यावर वाहन चालवत असताना स्वतःच्या किंवा इतरांच्या चुकीमुळे अनेक प्रसंगांना तोंड दयावं लागतं. अनेकदा राग अनावर झाल्यानं वादाला तोंड फुटतं. तर कधी मारामारीसुद्धा होते. अशा घटना नेहमीच घडतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका घटनेबद्दल माहिती देणार आहोत. तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये एका महिलेने वॉचमनला चांगलाच चोप दिला आहे.

ही संपूर्ण घटना कॅमेरात कैद झाली असून आता सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या महिलेनं एका बिल्डींगच्या वॉचमनला चपलेनं मारलं आहे. स्थानिक पोलिसांनी या वॉचमनबाबत तक्रार दाखल करून घेतली आहे. कोर्टाकडून परवागनी मिळाल्यानंतर आता केस दाखल केली जाणार आहे. 

माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ चंद्रनगर अपार्टमेंटमधील आहे.  सोमवारी हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला. सीसीटीव्हीमध्ये दिसून आले की, महिला एका चालवत येत  होती. त्यानंतर वॉचमन आणि महिला यांच्यात वाद झाल्यानंतर ही महिला थेट  गाडीच्या बाहेर आली आणि वॉचमनला चपलेनं मारू लागली.

सदर घटनेतील महिला आणि वॉचमन यांच्यात कोणत्या कारणामुळे वाद झाला याबाबत माहिती मिळालेली नाही.  तुम्ही या व्हिडीओमध्ये पाहू शकता. अत्यंत रागात या महिलेनं सुरूवातीला हात उचलला आहेत. त्यानंतर पायातील चप्पला काढून मारायला सुरूवात केली आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर  गाडी आत शिरण्यावरून बाचाबाची झाली असावी असं समजलं जात आहे. पोलिसांकडून या प्रकरणाबाबत अधिक चौकशी केली जात आहे.

हे पण वाचा

'हंबरून वासराले चाटती जवा गाय', गाडीखाली सापडलेल्या वासराला लोकांनी वाचविले अन्...

सलाम! कधीही विसरणार नाही रात्रंदिवस राबणाऱ्या कोरोनायोद्ध्याचं बलिदान; मन हेलावून टाकणारा फोटो

Web Title: Video: Hyderabad woman assaults watchman for stopping her car video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.