भूकेपोटी चोरी करणाऱ्याला रोखलं, जेवण दिलं; यूएसमधील भारतीयाचा वाटेल अभिमान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 02:35 PM2019-05-17T14:35:58+5:302019-05-17T14:37:23+5:30

कोणतीही व्यक्ती जन्माने चोर नसते. परिस्थितीमुळे काही लोकांना चोरी करावी लागते. अमेरिकेतील ओहायोमध्ये एक घटना घडली आहे.

Video : Indian Owner catches hungry teen shoplifting doesn't call the cops but gives him food | भूकेपोटी चोरी करणाऱ्याला रोखलं, जेवण दिलं; यूएसमधील भारतीयाचा वाटेल अभिमान

भूकेपोटी चोरी करणाऱ्याला रोखलं, जेवण दिलं; यूएसमधील भारतीयाचा वाटेल अभिमान

Next

कोणतीही व्यक्ती जन्माने चोर नसते. परिस्थितीमुळे काही लोकांना चोरी करावी लागते. अमेरिकेतील ओहायोमध्ये एक घटना घडली आहे. एक शिकला सवरलेला मुलगा चोर होण्यापासून वाचला. खरंतर त्याला भूक लागली होती. त्यामुळे तो एका स्टोरमध्ये गेला आणि चोरी करू लागला होता. चोर पकडला गेला. या स्टोरचा मालक एक भारतीय होता. विचारपूस केल्यावर कळाले की, चोरी करणाऱ्याला भूक लागली होती, पण त्याच्याकडे पैसे नव्हते. भारतीय स्टोर मालकाचं मन हेलावलं आणि त्याने चोरी करणाऱ्या तरूणाला खाण्याच्या वस्तू मोफत दिल्या. अशाप्रकारे या भारतीय व्यक्तीने त्या तरूणाला चोर होण्यापासून वाचवले. 

जय सिंह 7/11 स्टोरचे मालक आहेत. त्यांच्या कर्मचाऱ्याने त्यांना सांगितले की, एक व्यक्ती चोरी करत आहे. ते लगेच तिकडे गेले आणि त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा पाहिला. तेव्हा हे कळाले की, १८ ते १९ वयाचा एक तरूण शॉपलिफ्टिंग करत आहे. जय सिंह बाहेर आले आणि त्यांनी त्याला सगळं साहित्य परत देण्यास सांगितले. 

पोलिसांना केला फोन

सिंह यांनी आधी तरूणाच्या खिशातील सगळं साहित्य काढलं. त्यानंतर जय सिंह यांनी कर्मचारी महिलेला पोलिसांना 911 वर कॉल करायला सांगितलं. दरम्यान जय सिंह यांनी त्याला विचारले की, तू चोरी का केलीस? यावर त्याने सांगितले की, त्याला भूक लागली होती. पण त्याच्याकडे पैसे नसल्याने त्याने चोरी केली. सिंह यांनी लगेच पोलिसांना केलेला फोन कट करण्यास सांगितले. 

जय सिंह यांनी सांगितले की, 'जे तू चोरी करत होता, ते खाण्याचं नव्हतं. मी देतो तुला जेवण'. सिंह यांनी इंटरव्ह्यूमध्ये सांगितले की, जेव्हा त्याने मला सांगितले की, त्याला भूक लागली आहे. तेव्हा माझा विचार बदलला. त्यांनी विचार केला की, ही समस्या कुणालाही येऊ शकते. एकदा जर हे प्रकरण पोलिसात गेलं तर त्याला कधीच नोकरी मिळणार नाही. त्यामुळे त्यांनी त्याला खाण्याच्या वस्तू दिल्या आणि बोलले की, हे तू आधीच सांगितले असते तर तुला चोरी करण्याची गरज पडली नसती.

Cedric Bishop हे त्यावेळी स्टोरमध्ये हजर होते, जेव्हा ही घटना घडली. त्यांनी ही घटना सोशल मीडियात शेअर केली आहे. त्यांनी मालकाचं कौतुक देखील केलं. 

Web Title: Video : Indian Owner catches hungry teen shoplifting doesn't call the cops but gives him food

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.