Video: भारतीय कुठं डोकं लावतील सांगता येत नाही; ड्राहयव्रने ऑटोला बनवलं Wagon R, पाहा देसी जुगाड...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 04:14 PM2023-04-27T16:14:07+5:302023-04-27T16:14:57+5:30

या ऑटो ड्रायव्हरचा देसी जुगाड पाहून तुम्हीही चक्रावून जाल.

Video: It is impossible to tell where the Indians will put their heads; auto driver makes Wagon R out of auto | Video: भारतीय कुठं डोकं लावतील सांगता येत नाही; ड्राहयव्रने ऑटोला बनवलं Wagon R, पाहा देसी जुगाड...

Video: भारतीय कुठं डोकं लावतील सांगता येत नाही; ड्राहयव्रने ऑटोला बनवलं Wagon R, पाहा देसी जुगाड...

googlenewsNext


Jugaad Video: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल, सांगता येत नाही. कधी कुणी आपल्या कारला हेलिकॉप्टर बनवतो, तर कधी कुणी आणकी काही विचित्र मॉडिफीकेशन करतो. आता असाच एक नवा जुगाड व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हीही चक्रावून जाल. या व्हिडिओमध्ये एका व्यक्तीने त्याच्या ऑटोला Wagon R कार बनवलं आहे. 

या देसी जुगाडासाठी चालकाने काही जुन्या वाहनांचे पार्ट वापरले आणि वॅगन आर कारचा मागील भाग त्याच्या ऑटोच्या मागील बाजूस लावला आहे. पाठीमागून हा ऑटो दिसायला एकदम Wagon R कारसारखाच दिसतो. समोर आल्यावरच तो ऑटो असल्याचे दिसते. असा देसी जुगाड करण्याची आयडिया या ऑटो ड्रायव्हरकडे कुठून आली, असा प्रश्न तुम्हाला पडेल.

हा जुगाड सोशल मीडियावर लोकप्रिय झाला असून लोक तो बनवणाऱ्या व्यक्तीचे कौतुकही करत आहेत. @ragiing_bull नावाच्या युजरने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ जुना असला तरी तो सोशल मीडियावर आजही व्हायरल होत आहे. व्हिडिओला हजारो व्ह्यूज मिळाले आहेत आणि लोक खूप कमेंट्सही करत आहेत. बहुतेक लोकांनी हसणारे इमोजी शेअर केले आहेत. 

Web Title: Video: It is impossible to tell where the Indians will put their heads; auto driver makes Wagon R out of auto

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.