VIDEO: मुंबई लोकलमध्ये 'कांटा लगा' गाण्यावर काकांचा भन्नाट डान्स, व्हिडिओ एकदा पाहाच...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2024 07:09 PM2024-10-22T19:09:32+5:302024-10-22T19:10:59+5:30

हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

VIDEO : 'Kanta Laga...' Mumbai Local train, uncles sang song and dance, video viral | VIDEO: मुंबई लोकलमध्ये 'कांटा लगा' गाण्यावर काकांचा भन्नाट डान्स, व्हिडिओ एकदा पाहाच...

VIDEO: मुंबई लोकलमध्ये 'कांटा लगा' गाण्यावर काकांचा भन्नाट डान्स, व्हिडिओ एकदा पाहाच...

Mumbai Local Viral Video : सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हायरल होत असते. विशेषतः गेल्या काही काळापासून दिल्ली मेट्रो आणि मुंबई लोकल ट्रेनचे व्हिडिओ सातत्याने व्हायरल होत आहेत. यातील काही व्हिडिओ भांडणाचे असतात, तर काही स्टंट, डान्स आणि गाण्याचे असतात. सध्या अशाच प्रकारचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ मुंबई लोकल ट्रेनचा आहे. 

मुंबईकर काकांनी लोकलमध्ये 'माहोल' बनवला
मुंबईची लाईफ लाईन असलेल्या लोकल ट्रेनमधून दररोज लाखो लोक प्रवास करतात. या लोकल ट्रेनमध्ये अनेकदा प्रवासी गाणे गाताना किंवा डान्स करताना तुम्ही पाहिले असेल. हे दृष्य प्रामुख्याने सकाळी आणि संध्याकाळी पाहायला मिळते. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात वयोवृद्ध लोकांचा एक ग्रुप मुंबई लोकलमध्ये 'कांटा लगा' गाणे गाताना आणि त्यावर डान्स करताना दिसत आहे. कुणी गाणे गातोय, कुणी टाळ्या वाजवतोय तर कुणी नाचताना दिसतोय. मुंबई लोकलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर @mumbaiheritage नावाच्या अकाउंटवरुन पोस्ट केला गेला आहे. या व्हिडिओला लाखो व्ह्यू मिळाले असून, नेटकरी त्यावर विविध कमेंट्सही करत आहेत. 

Web Title: VIDEO : 'Kanta Laga...' Mumbai Local train, uncles sang song and dance, video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.