VIDEO: धावत्या कारसमोर अचानक पडली वीज; धक्कादायक व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2023 07:13 PM2023-07-16T19:13:41+5:302023-07-16T19:14:20+5:30

Lightning Strike: हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

VIDEO: Lightning strikes in front of running car; Caught on shocking video camera | VIDEO: धावत्या कारसमोर अचानक पडली वीज; धक्कादायक व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद

VIDEO: धावत्या कारसमोर अचानक पडली वीज; धक्कादायक व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद

googlenewsNext

Lightning Strike Video Viral: सध्या भारतातील अनेक राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे अनेक भाग जलमय झाले असून, पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुरामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात पूरासोबतच वीज पडण्याचाही सर्वात मोठा धोका असतो. दरवर्षी पावसाळ्यात वीज पडण्याच्या अनेक घटना घडतात, याचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच एक भयावह व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ कारमधून घेण्यात आला आहे. यात कार रस्त्याने वेगाने धावताना दिसत आहे, यावेळी अचानक जमिनीवर वीज पडते आणि मोठा स्फोट होतो. हा स्फोट इतका जोरदार होता की, बॉम्बस्फोट झाल्याचा भास होतो. हा स्फोट किती जबरदस्त आहे, हे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. एखादी व्यक्ती तिथे उभी असती, तर त्याचा नक्कीच कोळसा झाला असता. सुदैवाने या घटनेत कोणाला इजा झाली नाही.

ही पहिली घटना नाही
विजांच्या कडकडाटांमुळे नागरिकांना मुसळधार पावसात घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला जातो. आतापर्यंत अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यात वीज पडून लोकांचा मृत्यू झाला आहे. जीवाचा धोका टाळण्यासाठी हवामान खात्याने दिलेला 'अलर्ट' गांभीर्याने घ्या. भारतात मान्सून सुरू आहे, त्यामुळे अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. वीज पडण्याच्या घटना अनेक ठिकाणी घडू शकतात, त्यामुळे सावध राहा.

Web Title: VIDEO: Lightning strikes in front of running car; Caught on shocking video camera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.