VIDEO : कोका कोलाच्या नावाने फसवणूक, बाजारात विकलं जात आहे नकली कोल्ड ड्रिंक!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2024 12:54 PM2024-04-02T12:54:42+5:302024-04-02T12:55:09+5:30

या व्हिडीओत काही लोक एका ठिकाणी नकली कोला कोला तयार करताना दिसत आहे. अशात हा व्हिडीओ कोल्ड ड्रिंकच्या शौकीनांसाठी एक शिकवण आहे.

Video : Making of fake coca cola internet gets scared viral video | VIDEO : कोका कोलाच्या नावाने फसवणूक, बाजारात विकलं जात आहे नकली कोल्ड ड्रिंक!

VIDEO : कोका कोलाच्या नावाने फसवणूक, बाजारात विकलं जात आहे नकली कोल्ड ड्रिंक!

कोल्ड ड्रिंक आपल्या आरोग्यासाठी किती नुकसानकारक आहेत हे सगळ्यांना माहीत आहे. तरीही जास्तीत जास्त लोक उन्हाळ्यात थंड होण्यासाठी कोल्ड ड्रिंकचं सेवन करतात. पण आता एक असा व्हिडीओ समोर आला आहे ज्यात कोका कोलाची भेसळ केली जात आहे. या व्हिडीओत काही लोक एका ठिकाणी नकली कोला कोला तयार करताना दिसत आहे. अशात हा व्हिडीओ कोल्ड ड्रिंकच्या शौकीनांसाठी एक शिकवण आहे.

नकली कोका कोलाच्या मेकिंगच्या या व्हिडीओने सोशल मीडिया एक वाद पेटला आहे. अनेक लोकांनी या व्हिडीओवर कमेंट केली आहे. एका यूजरने लिहिलं की, 'असे दोन तीन व्हिडीओ आणखी बनवा लोक यावर बहिष्कार घालणं सुरू करतील'.

या व्हिडीओवर मात्र कोका कोला कंपनी अजूनही मूग गिळून गप्प आहे. एका दुसऱ्या यूजरने लिहिलं की, 'पण हे लोक असं रेकॉर्डिंग करण्याची परवानगी कशी देतात. सुदैवाने मी कोल्ड ड्रिंक पित नाही'. सध्या सोशल मीडियावर व्हायरल हा व्हिडीओ पाहून लोक हैराण झाले आहेत. तसेच वादही सुरू आहे.

आधीच कोल्ड ड्रिंक पिऊन लोकांना आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या गंभीर समस्या होतात. त्यात जर यातही भेसळ किंवा नकली पद्धतीने तयार केलं जात असेल तर याने तर लोकांच्या जीवालाही धोका होऊ शकतो. अशात एक्सपर्ट कोल्ड ड्रिंक न पिण्याचाच सल्ला देतात.

Web Title: Video : Making of fake coca cola internet gets scared viral video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.