VIDEO : कोरोनाला न घाबरता डबल-ट्रिपल सीट नाही तर 5 तरूणींना एकाच गाडीवर नेत होता अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 10:19 AM2020-03-23T10:19:43+5:302020-03-23T10:23:43+5:30

कोरोनाला न घाबरता एका स्कूटीवर एक व्यक्ती तब्बल 5 मुलींना घेऊन जाताना दिसत आहे.

VIDEO: man with 5 women on bike in china video viral api | VIDEO : कोरोनाला न घाबरता डबल-ट्रिपल सीट नाही तर 5 तरूणींना एकाच गाडीवर नेत होता अन्...

VIDEO : कोरोनाला न घाबरता डबल-ट्रिपल सीट नाही तर 5 तरूणींना एकाच गाडीवर नेत होता अन्...

Next

कोरोना व्हायरसची सुरूवात झालेल्या चीनमध्ये आता परिस्थिती सुधारली असली तरी शासन योग्य ती काळजी घेत आहेत. 22 मार्चला भारतातली जनता कर्फ्यू लावण्यात आला होता. लोकांचा दिवसभर चांगला प्रतिसादही मिळाला. पण सायंकाळी घंटानादच्या नादात दिवसभराची मेहनत वाया गेली. कारण काही ठिकाणी शेकडो लोक एकत्र येऊन घंटा, टाळ्या वाजवत होते. दरम्यान चीनमधील एक असाच व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत बघू शकता की, एका स्कूटीवर एक व्यक्ती तब्बल 5 मुलींना घेऊन जाताना दिसत आहे.

चीनमध्ये कोरोनाने होत्याचं नव्हतं करून टाकलं होतं. आता कोरोनाच्या केसेस तिथे आढळत नाही. पण काळजी घेण्याचं आवाहन सरकारने केलं आहे. लोकांना जास्त एकत्र न येण्यास सांगण्यात आलं आहे. पण एकाने हे काही न जुमानता एकाच गाडीवर 5 मुली घेऊन प्रवास केला.

डेली मेलच्या एका रिपोर्टनुसार, हा व्हिडीओ चीनमधील असल्याचा दावा केला जात आहे. या व्हिडिओमध्ये स्कूटरवर तब्बल 6 लोक बसल्याचं दिसत आहे. त्यांनी मास्कही लावलेला नाही आणि सोशल डिस्टंसिंगचं पालनही केलेलं नाही. पण संबंधित व्यक्तीला एकाच गाडीवरून 6 जण जाणं महागात पडलं आहे. 

पोलिसांनी गाडी चालवणाऱ्या व्यक्तीसोबत पाचही मुलींना अटक केली आहे. पोलिसांनी विचारले असता व्यक्तीने सांगितलं की, गाडीवर बसलेल्या सर्व महिला आइस्क्रीम शॉपमध्ये काम करतात. त्यांनी लिफ्ट मागितली होती. पोलिसांनी त्या 5 महिलांनाही अटक केली आहे.


Web Title: VIDEO: man with 5 women on bike in china video viral api

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.