Video : 'मास्क क्यू नही लगाते?' असं विचारल्यास पठ्ठ्याने जे उत्तर दिलं ऐकून पोट धरून हसाल...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2020 02:00 PM2020-10-26T14:00:13+5:302020-10-26T14:04:04+5:30

Viral News in Marathi : माणसाला मास्क लावण्याचे कारण विचारलं तेव्हा या माणसाचा आगळा वेगळा तर्क ऐकून सगळेच चकीत झाले.

Video: Man gave unique logic for not wearing mask video viral on twitter | Video : 'मास्क क्यू नही लगाते?' असं विचारल्यास पठ्ठ्याने जे उत्तर दिलं ऐकून पोट धरून हसाल...

Video : 'मास्क क्यू नही लगाते?' असं विचारल्यास पठ्ठ्याने जे उत्तर दिलं ऐकून पोट धरून हसाल...

Next

कोरोना काळात मास्कचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे. जोपर्यंत लस किंवा औषध उपलब्ध होत नाही. मास्कचा वापर शस्त्राप्रमाणेच केला जात आहे. अजूनही काही लोक मास्कच्या वापराबाबत  निष्काळजीपणा करताना दिसून येत आहेत. यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत जाऊ शकते. सोशल मीडियावर एका माणसाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला या माणसाचा राग येईल आणि हसायलाही येईल.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एक रिपोर्टर या माणसाला मास्क का नाही लावला याचं कारण विचारत आहे. यावर या माणसानं खूप विनोदी उत्तर दिलं आहे. या व्हिडीओतील माणूस हा बिहारचा रहिवासी आहे. मास्क न लावल्याचे कारण  विचारल्यानंतर  त्याने सांगितले की, माझ्या जवळपास कोणी शिंकलं किंवा खोकले तर मी श्वास रोखून धरतो आणि लांब जाणून श्वास घेतो. एनडिटिव्हीच्या प्रतिनिधीने जेव्हा या माणसाला मास्क लावण्याचे कारण  विचारलं तेव्हा या माणसाचा आगळा वेगळा तर्क ऐकून सगळेच चकीत झाले.

 मास्क न वापरण्याबाबत प्रश्न विचारल्यास त्याने सांगितले की,  जेव्हा मी मास्क लावतो तेव्हा मास्क निघून जातो. म्हणून माझ्या आजूबाजूला कोणी शिंकले किंवा खोकले तर मी दीड मिनिटासाठी श्वास रोखून धरतो. हा व्हिडीओ उमाशंकर सिंह यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. आतापर्यंत १ लाखांपेक्षा अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून ५ हजारापेक्षा जास्त लाईक्स या व्हिडीओला मिळाले आहेत. मास्क लावताना आणि काढल्यानंतर तुम्हीही याच चुका करता? तज्ज्ञांनी सांगितला बचावाचा उपाय

दरम्यान गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 45,149 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 480 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आता भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 79,09,960 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात एक लाखाहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने घट होताना पाहायला मिळत आहे. देशातील कोरोना प्रादुर्भावाचा वेग कमी होताना दिसत आहे. वाह, नशीब चमकलं! मासेमाराच्या गळाला लागला ७५० किलोंचा दुर्मिळ 'मंटा-रे' मासा, पाहा फोटो

Web Title: Video: Man gave unique logic for not wearing mask video viral on twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.