VIDEO : उघड्यावर शौचास गेला अन् अजगराने विळखा घातला आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 02:20 PM2024-07-27T14:20:44+5:302024-07-27T14:21:14+5:30

VIDEO : मध्य प्रदेशमध्ये एक व्यक्ती उघड्यावर शौचास बसली होती. यावेळी झुडपात बसलेल्या अजगराने त्याच्यावर हल्ला केला.  

VIDEO : Man was go for toilet outside python catch him | VIDEO : उघड्यावर शौचास गेला अन् अजगराने विळखा घातला आणि मग...

VIDEO : उघड्यावर शौचास गेला अन् अजगराने विळखा घातला आणि मग...

VIDEO : उघड्यावर शौचास गेला अन् अजगराने विळखा घातला
सरकारने उघड्यावर शौचास जाणे बंद करण्यासाठी प्रत्येक घरात शौचालये बांधण्याची योजना सुरू केली आहे. असे असताना काहींची उघड्यावर शौच करण्याची सवय जात नाही. मात्र, ही सवय एका व्यक्तीला महागात पडली आहे. मध्य प्रदेशमध्ये एक व्यक्ती उघड्यावर शौचास बसली होती. यावेळी झुडपात बसलेल्या अजगराने त्याच्यावर हल्ला केला.  

अजगराने त्या माणसाला आपला शिकार बनविण्यासाठी इतक्या वेगाने पकडले की तो उठून पळू शकला नाही. त्या व्यक्तीने लोकांना हाक मारण्यास सुरुवात केली. यानंतर गावातील लोकांनी धाव घेत त्याला अजगरावर हल्ला केला. त्यात अजगराचा मृत्यू झाल्याने माणसाचा जीव वाचला. 

दरम्यान, त्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.  यापुढे ती व्यक्ती कधीही उघड्यावर शौचास जाणार नाही, असे नेटकरी या व्हिडीओवर व्यक्त होताना म्हणत आहेत. गावातील लोकांनी अजगराला जीवे मारून व्यक्तीचा जीव वाचवला.

मीडिया रिपोर्टनुसार, अजगराला मारण्यासाठी गावातील लोकांविरोधात कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात आली नाहीये. वन विभागाचे अधिकारे म्हणाले की, जर एखाद्या व्यक्तीचा जीव वाचवण्यासाठी एखाद्या प्राण्याला मारलं जातं तेव्हा तो गुन्हा ठरत नाहीत.

Web Title: VIDEO : Man was go for toilet outside python catch him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.