Video : गाईला मारायला गेला, अन् चांगलाच तोंडावर पडला; 'असा' घेतला बदला; पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2020 12:51 PM2020-12-11T12:51:59+5:302020-12-11T12:58:25+5:30

Trending Viral News in Marathi : इतकंच नाही तर माणूस गाईला मारल्यानंतर तीची शेपटीसुद्धा पिळतो. ही शेपटी पिळल्यानंतर गाईला प्रचंड वेदना सुद्धा  होतात. तसंच राग सुद्धा येतो. 

Video: Man were beating cow she attacked on him video will shock you | Video : गाईला मारायला गेला, अन् चांगलाच तोंडावर पडला; 'असा' घेतला बदला; पाहा व्हिडीओ

Video : गाईला मारायला गेला, अन् चांगलाच तोंडावर पडला; 'असा' घेतला बदला; पाहा व्हिडीओ

Next

करावे तसे भरावे असं तुम्ही ऐकलं असेलच. गाईला हिंदू धर्मात देवता मानलं जातं. येता जाताना कधीही गाय दिसली दर नेहमीच लोक गाईचा नमस्कार करतात. गाईचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता एका गाईला हा माणूस मारत आहे. इतकंच नाही तर माणूस गाईला मारल्यानंतर तीची शेपटीसुद्धा पिळतो. ही शेपटी पिळल्यानंतर गाईला प्रचंड वेदना सुद्धा  होतात. तसंच राग सुद्धा येतो. 

गाईची शेपटी पिळल्यानंतर तीला प्रचंड राग येतो. आपली सहनशक्ती संपल्यानंतर ही गाय या माणसाला चांगलीच अद्दल घडवते. Praveen Angusamy या आयएफएस अधिकाऱ्याने या व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. सुरूवातीला  हा माणूस गाईला लाथ मारतो आणि शेपटी पिळतो. गाईचा राग अनावर झाल्यानंतर ती त्याला शिंगसुद्धा मारते. हा व्हिडीओ पाहून अनेकांचा भीतीने थरकाप उडाला आहे. कारण गाय जेव्हा त्या माणसाच्या अंगावर धावून जाते.  त्यावेळी त्या माणसाचं काय झालं असेल याचा विचारही केला जाऊ शकत नाही. लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली, अन् आता १० रूपयात लोकांना पोटभर जेवण पुरवतोय 'हा' अन्नदाता

अनेकांना हा व्हिडीओ पाहून राग अनावर झाला आहे. या प्रकरणाबाबत पोलिसात तक्रार  दाखल करायला हवी असं अनेकांचे म्हणणे आहे. आतापर्यंत दोन हजारांपेक्षा जास्त लोकांना हा व्हिडीओ पाहिला असून संतप्त प्रतिक्रिया या व्हिडीओवर आल्या आहेत. Video : कमाल! कात्री, कंगवा घेतला अन् स्वतःच न्हावी बनला, अशी केली जबरदस्त हेअरस्टाईल

Web Title: Video: Man were beating cow she attacked on him video will shock you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.