Video : पाकमध्ये पहिल्यांदाच सुरू झाली मेट्रो; पब्लिकची प्रवासाची स्टाईल पाहून पोट धरून हसाल
By Manali.bagul | Published: November 5, 2020 12:56 PM2020-11-05T12:56:54+5:302020-11-05T17:10:59+5:30
Viral News in Marathi : आतापर्यंत १ लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून ३ हजारापेक्षा जास्त लाईक्स या व्हिडीओला मिळाले आहेत.
पाकिस्तानात लॉकडाऊननंतर आता पहिल्यांदाच मेट्रो सुरू झाली आहे. पाकमधील मेट्रो प्रवासाचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. मागच्या आठवड्यापासून लाहोरमध्ये ही ट्रेन सुरू झाली. २७ किलोमीटरच्या या ऑरेंज लाईनमध्ये जवळपास २६ स्टेशन येतात. आता पाकिस्तानातील लोक सहज लांबचा प्रवास करू शकतात. बसने ज्या ठिकाणी पोहोचण्यासाठी तासनतास घालवावे लागतात. त्या ठिकाणी मेट्रोने अत्यंत कमी वेळात पोहोचता येऊ शकतं. सोशल मीडियावर यादरम्यान अनेक व्हिडीओज व्हायरल झाले. त्यात लोक प्रवासाचा आनंद घेताना दिसून येत आहेत.
Lahore’s Orange Line metro providing new entertainment opportunities to public 🤦🏼♂️😐 🚇 pic.twitter.com/pEf4q3uT0j
— Danyal Gilani (@DanyalGilani) November 2, 2020
दनयाल गिलानी यांनी सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. दोन नोव्हेंबरला हा फोटो ट्विटरवर पोस्ट केला होता. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले होते. की, पाकिस्तानची जनता प्रवासाचा आनंद घेत आहे. आतापर्यंत १ लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून ३ हजारापेक्षा जास्त लाईक्स या व्हिडीओला मिळाले आहेत. तर अनेकांनी मजेशीर कमेंट्स या व्हिडीओवर केल्या आहेत.
स्टेशनच्या बाहेरआली मेट्रो , 'व्हेल'च्या शेपटीमुळे मोठा अपघात टळला
नेदरलॅंडच्या रॉटरडॅम शहरात एका मेट्रोचा मोठा अपघात इथे सुदैवाने टळला. या धक्कादायक घटनेचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. जे पाहून तुम्हाला मरणाच्या दारातून परतणं कशाला म्हणतात हे समजेल. हे रॉटरडॅम शहरातील मेट्रोचं शेवटचं स्टेशन होतं. हे स्टेशन पाण्यावर बांधलं आहे. जिथे हे स्टेशन संपतं तिथे इंजिनिअरने सुंदरतेसाठी एक 'व्हेल' शेपटी तयार केली होती. ज्यातील एका शेपटीमुळे मेट्रो जमिनीवर पडण्यापासून वाचली.
Het onderzoek naar het bizarre metro ongeval in Spijkenisse is nog in volle gang. De machinist van het metrostel is aangehouden en wordt verhoord door de politie. pic.twitter.com/DGQNpVs2bj
— Joey Bremer (@010fotograaf) November 2, 2020
जेव्हा या घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना आणि बचाव दलाला मिळाली तेव्हा ते लगेच मदतीसाठी पोहोचले. यादरम्यान एका फोटोग्राफर, ब्लॉगर Joey Bremer हेही पोहोचले. त्यांनी काही या अपघाताचे फोटो काढले आणि सोशल मीडियावर शेअर केलेत. ही मेट्रो जमिनीपासून १० मीटर वर हवेत लटकली होती. या अपघातात मेट्रोचं आतून नुकसान जाल आहे. खिडक्याही तुटल्या आहेत. ही घटना सोमवारी पहाटे घडली. सुदैवाने यावेळी मेट्रोमध्ये एकही प्रवासी नव्हता. मेट्रो शेवटच्या स्टेशनवर थांबलीच नाही आणि ट्रॅकवरून बाहेर निघाली. पुढे येऊन मेट्रो व्हेलच्या शेपटीवर येऊन अडकली. कथितपणे ड्रायव्हर स्वत:च ट्रेनमधून बाहेर आला. त्याला या अपघातात काही झालं नाही. Video : चालत्या ट्रेनमध्ये चिमुरड्यानं केला असा काही स्टंट; व्हिडीओ पाहून तुमचीही उडेल झोप
असे सांगितले जात आहे की, व्हेलची शेपटी पॉलिस्टरपासून तयार केली आहे. ही डच आर्किटेक्ट Maarten Strujs ने डिझाइन केली होती. २००२ मध्ये मेट्रो स्टेशनच्या शेवटी हे शेपटी लावली होती. ही शेपटी केवळ सौंदर्यीकरणासाठी लावण्यात आली होती. या अपघाताची चौकशी केली जात आहे. शाब्बास! नागपूरच्या २४ वर्षीय पोरानं गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी तयार केली 'अशी' 2 इन 1 बॅग