मध्यमवर्गीय तरूणाचं ताजमध्ये चहा पिण्याचं स्वप्न पूर्ण, सांगितलं कसा होता 2124 रूपयांचा चहा!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 10:22 AM2024-11-21T10:22:00+5:302024-11-21T10:31:07+5:30
Taj Hotel Chai : एका मध्यमवर्गीय तरूणाने त्याचं हे स्वप्न पूर्ण केलं. इतकंच नाही तर येथील चहा कसा लागतो आणि त्यासोबत काय मिळतं हेही सांगितलं आहे.
Taj Hotel Chai : भारतात चहा प्यायल्याशिवाय जास्तीत जास्त लोकांच्या दिवसाची सुरूवातच होत नाही. जर त्यांनी चहा घेतला नाही तर त्यांचा दिवसही बरोबर जात नाही. त्यामुळेच भारतात जागोजागी चहाच्या स्टॉल लागलेले बघायला मिळतात. मोठमोठ्या हॉटेल्समध्येही चहा मिळतो. मात्र, अनेकांची इच्छा असते की, एकदा तरी मुंबईच्या ताज हॉटेलमध्ये जाऊन चहा प्यावा. एका मध्यमवर्गीय तरूणाने त्याचं हे स्वप्न पूर्ण केलं. इतकंच नाही तर येथील चहा कसा लागतो आणि त्यासोबत काय मिळतं हेही सांगितलं आहे.
व्हिडिओत तरूण बोलताना दिसत आहे की, "तुम्ही माझ्यामागे भारतातील पहिलं फाईव्ह स्टार हॉटेल ताज महल पॅलेस बघत आहात. अनेकांचं हे हॉटेल आतून बघण्याचं स्वप्न असतं. तेच स्वप्न माझ्यासारख्या मध्यमवर्गीयाचं पूर्ण होत आहे. आज आपण पिणार आहोत ताज हॉटेलमधील भारतीय चहा". यानंतर तो ताजमध्ये एन्ट्री करतो आणि हॉटेलचं सौंदर्य दाखवतो.
यानंतर तो एक कप चहा मागवतो ज्याची किंमत २१२४ रूपये आहे. चहसोबत कॉम्प्लिमेंट्रीमध्ये दोन वडापाव, २ ग्रिल सॅंडविच, काजू कतली इत्यादी पदार्थ मिळतात. शेवटी त्याने या चहाचा रिव्ह्यू सुद्धा केला. तो म्हणाला की, चहाची टेस्ट फारच सामान्य होती. तो या चहाला १० पैकी ५ नंबर देईल.
सोशल मीडिया इंफ्लूएन्सर अदनान (@adnaan.08) ने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर ८ नोव्हेंबरला शेअर केला होता. त्याने पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, मुंबईच्या ताज हॉटेलचा चहा. आता त्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला २ कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत आणि १३ लाखांपेक्षा जास्त लाइक्स.
इतकंच नाही तर त्याच्या या व्हिडिओवर ६ हजारांपेक्षा जास्त लोकांनी कमेंट्सही केल्या आहेत. काही लोकांनी गमतीदार कमेंट्स तर अनेकांनी त्याचं कौतुक करणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत.