Video - 'वडापाव गर्ल'नंतर आता 'मॉडेल चहावाली' झाली फेमस; डॉली चहावाल्याला देतेय टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2024 12:45 PM2024-10-09T12:45:43+5:302024-10-09T12:46:17+5:30

Model Chaiwali : मॉडेल चहावालीची स्टायलिश स्टाईल सोशल मीडियावर लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. 

Video model chaiwali goes viral on social media after dolly chaiwala and vadapav girl | Video - 'वडापाव गर्ल'नंतर आता 'मॉडेल चहावाली' झाली फेमस; डॉली चहावाल्याला देतेय टक्कर

Video - 'वडापाव गर्ल'नंतर आता 'मॉडेल चहावाली' झाली फेमस; डॉली चहावाल्याला देतेय टक्कर

'डॉली चहावाला' आणि 'वडापाव गर्ल'चा सध्या सोशल मीडियावर बोलबाला आहे. डॉली चहावाल्याचा चहा बिल गेट्स यांनी देखील प्यायला आहे. तर वडापाव गर्ल तिच्या स्टाईलमुळे थेट बिग बॉस ओटीटीमध्ये पोहोचली होती. अशातच आता या दोघांना टक्कर देण्यासाठी 'मॉडेल चहावाली' आली आहे. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून तिची तुफान चर्चा रंगली आहे. 

सध्या लखनौमध्ये चहा विकणारी ही स्टायलिश मॉडेल चहावाली अल्पावधीतच लोकप्रिय झाली. तिच्या चहाच्या स्टॉलवर लोकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. काही लोकांनी तिचं भरभरून कौतुक केलं आहे. तर काहींनी टीका करत तिला ओव्हरएक्टिंग असं म्हटलं आहे. मॉडेल चहावालीची स्टायलिश स्टाईल सोशल मीडियावर लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. 


व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, मॉडेल चहा विकण्यासाठी तिच्या स्कूटरवर स्टॉलच्या ठिकाणी येते. तिने चहा बनवायला सुरुवात केली. दूध, साखर आणि चहा पावडर टाकल्यानंतर यामध्ये तिने गुलाबाच्या पाकळ्या देखील टाकल्या. चहा बनवतानाचा तिचा कूल अंदाज लोकांना आवडत आहे. ती हे सर्व करत असताना मॉडेलसारखी पोजही देते. 

इन्स्टाग्रामवर thehungrypanjabi या नावाच्या अकाऊंटवरून हा व्हि़डीओ शेअर करण्यात आला आहे. जो आतापर्यंत ३ लाख ४२ हजार लोकांनी लाईक केला आहे. अनेक लोकांनी या व्हिडीओतील मॉडेलवर टीका केली आहे. चहाची चव २ टक्के आणि ओव्हरएक्टिंग ९८ टक्के असं म्हणत चहावालीला ट्रोल केलं आहे. मात्र तरी देखील मॉडेल चहावालीची सर्वत्र जोरदार चर्चा रंगली आहे. 
 

Web Title: Video model chaiwali goes viral on social media after dolly chaiwala and vadapav girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.