'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2024 09:22 PM2024-10-07T21:22:21+5:302024-10-07T21:22:50+5:30

Model Chaiwali Viral Video: या 'मॉडेल चायवाली'चा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय.

video : 'Model Chaiwali' video gone viral on social media | 'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ

'डॉली चायवाला' विसरा; आता आली 'मॉडेल चायवाली', सोशल मीडियावर घातलाय धुमाकूळ

Model Chaiwali Viral Video: गेल्या काही काळापासून सोशल मीडियावर चहा-वडापाव विकणाऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत. याचे कारण म्हणजे, रस्त्यावर चहा-वडापाव विकणाऱ्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यातून त्यांना भरपूर प्रसिद्धी आणि पैसाही मिळतोय. याचे सर्वात मोठे उदाहरण 'डॉली चायवाला', 'ग्रॅज्युएट चायवाली' आणि 'वडापाव गर्ल' आहेत. 

गेल्या काही काळापासून सोशल मीडियावर या दोघांची बरीच चर्चा सुरू आहे. दोघेही त्यांच्या अनोख्या स्टाइलमुळे प्रसिद्ध झाले. टेक क्षेत्रातील दिग्गज बिल गेट्सने चहा प्यायल्यानंतर डॉली चायवालाची लोकप्रियता गगनाला भिडली. तर वडा पाव गर्लने वेगळ्या पद्धतीने प्रसिद्धी मिळवली. पण, आता या दोघांना टक्कर देण्यासाठी 'मॉडेल चायवाली' बाजारात आली आहे. सध्या सोशल मीडियावर हिची जोरदार चर्चा होत आहे.

लखनऊमध्ये चहाचा स्टॉल लावणारी 'मॉडेल चायवाली' तिच्या स्टायलिश अंदाज आणि सुंदर चेहऱ्यामुळे व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये दिसते की, 'मॉडेल चायवाली' स्कूटी चालवत आपल्या टपरीवर येते आणि सुरुवातीला मॅगी बनवते. यानंतर ती गुलाबाच्या पाकळ्या टाकलेला अनोखा चहा बनवते. संपूर्ण व्हिडिओमध्ये ती आपले नखरे, अदा दाखवताना दिसतेय. हा व्हिडिओ thehungrypanjabi या हँडलवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये टपरीचा पूर्ण पत्ताही लिहिला आहे. 


हा व्हिडिओ पाहून यूजर्स मजेशीर कमेंट्स करत आहेत. एका यूजरने लिहिले - चहा ठीक आहे पण मॉडेल कुठे आहे. आणखी एका यूजरने लिहिले  - चहाची चव 2% आणि ओव्हरॲक्टिंग 98% आहे. तिसऱ्या यूजरने लिहिले आहे - केसातील सर्व कोंडा चहामध्येच मिसळला. चौथ्याने लिहिले आहे – मी संपूर्ण व्हिडिओ पाहिला, पण मॉडेल कुठेच दिसली नाही.

कोण आहेत 'मॉडल चायवाली'?
सिमरन गुप्ता असे या मॉडेल चहावालीचे नाव आहे. सिमरन मुळची उत्तर प्रदेशमधील गोरखपूरची आहे. सिमरनने मिस गोरखपूर स्पर्धा देखील जिंकली आहे. सिमरन आधी मॉडलिंग करत होती. काही जाहिरातीमध्ये काम करण्याची संधीही तिला मिळाली. मात्र, घराची जबाबदारी तिच्यावर असल्याने तिने लखनौ येथे स्वत:चा चहाचा व्यवसाय सुरू केला आहे. 


 

Web Title: video : 'Model Chaiwali' video gone viral on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.