Video : हत्तीने मस्करीत म्हशीला मारली लाथ;अन् म्हशीने घेतलेला बदला पाहून म्हणाल, वाह क्या बात! 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2020 04:08 PM2020-06-15T16:08:10+5:302020-06-15T16:10:50+5:30

हत्ती म्हशीच्या जवळ सहज मस्ती करत जातो आणि लाथ मारतो. त्यानंतर म्हशीला मात्र राग अनावर होतो.

Video: Naughty elephant kicks the buffalo for fun see what happens next video goes viral | Video : हत्तीने मस्करीत म्हशीला मारली लाथ;अन् म्हशीने घेतलेला बदला पाहून म्हणाल, वाह क्या बात! 

Video : हत्तीने मस्करीत म्हशीला मारली लाथ;अन् म्हशीने घेतलेला बदला पाहून म्हणाल, वाह क्या बात! 

googlenewsNext

सोशल मीडियावर वाइल्डलाइफ व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर बघितले जातात. लॉकडाऊनच्या काळात सोशल मीडियावर तुम्ही प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या मुक्त संचाराचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील. अलिकडे सोशल मीडियावर हत्ती आणि म्हशींचा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हलाही हसू आवरलं जाणार नाही. या व्हिडीओमध्ये हत्तीने मस्ती करताना म्हशीला मारलं आहे. त्यानंतर म्हशीने जी  रिएक्शन दिली ती खूपच कमाल आहे.

या व्हिडीयोमध्ये तुम्ही पाहू शकता, हत्ती म्हशीच्या जवळ सहज मस्ती करत जातो आणि लाथ मारतो. त्यानंतर म्हशीला मात्र राग अनावर होतो. म्हैस उठून हत्तीच्या मागे जाते. तसंच हत्तीला आपल्या शिंगांनी मारण्याचा प्रयत्न करते. इतकंच नाही म्हशीला आपल्या दिशेने येताना बघून हत्ती पळायला सुरूवात करतो. या व्हिडीयोला इंडियन फॉरेस्ट ऑफिसर सुशांत नंदा यांनी शेअर केला आहे. 

हा व्हिडीओ शेअर करत असातना सुशांत नंदा यांनी म्हटलं आहे की. हत्ती खूपच  खोडकर आहे. गमतीने हत्ती म्हशीला मारण्यासाठी आणि चिडवण्यासाठी खोड काढताना तुम्हाला दिसून येईल. या व्हिडीओला आतापर्यंत २४ हजारांपेक्षा जास्त व्हिव्हज् आणि २  हजारांपेक्षा जास्त लाईक्स आणि ५०० रिट्विट्स मिळाले आहेत. लोकांना म्हशीची आणि हत्तीची मस्ती खूप आवडली आहे. 

या' देशात आहे; जगातील सगळ्यात उंच भगवान विष्णूंची मुर्ती, ८०० कोटींचा झाला होता खर्च

काय सांगता! अंतराळातील एक असं ब्लॅक होल जे हृदयासारखं 'धडधडतं', पण का?

Web Title: Video: Naughty elephant kicks the buffalo for fun see what happens next video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.