Video: सफारी गाईडने थेट चित्त्यासोबत घेतला सेल्फी, नेटकऱ्यांनी विचारले 'जिवंत आहे की नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2022 10:46 AM2022-09-25T10:46:39+5:302022-09-25T19:02:44+5:30
सेल्फीसाठी कोण कशी धाडस करेल हे सांगता येत नाही. अशाच एका धाडसाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ एका जंगलातील आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती थेट चित्त्यासोबत सेल्फी घेत असल्याचे दिसत आहे.
सेल्फीसाठी कोण कशी धाडस करेल हे सांगता येत नाही. अशाच एका धाडसाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ एका जंगलातील आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती थेट चित्त्यासोबत सेल्फी घेत असल्याचे दिसत आहे.जंगलातील सफारी दरम्यान आपल्याला जंगलातील प्राण्यांना जवळून पाहता येते. त्या प्राण्यांसोबत कधी कधी फोटोही घेता येतात. पण कधी कधी जवळ जाऊन फोटो घेणे महागात पडते, सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे.
या व्हिडिओमध्ये एक सफारी गाईड चक्क चिता सोबत सेल्फी घेत असल्याचे दिसत आहे. पण पुढच्याच क्षणात असं काही घडतं की, ते पाहून सगळेच थक्क होतात. पर्यटकांनी भरलेल्या सफारी जीपकडे चीता येत असताना व्हिडिओची सुरुवात होते.पुढे ते चिता उडी मारून जीपच्या छतावर येतो, आणि तिथे बसतो.
या' रस्त्यावरून चालताना अचानक गायब होते कार; जाणून घ्या, रहस्यमय हायवेची गोष्ट
यावेळी हा चित्ता जीपच्या उघड्या छतावरून आत डोकावून पाहण्याचा प्रयत्न करतो.जीपमध्ये बसलेले सर्वजण चिताला पाहून घाबरतात, पण सफारी गाईड तिथे येऊन चित्त्यासोबत सेल्फी घेतो.
African Selfie…Cheetah style pic.twitter.com/WnOHkB5J9D
— Clement Ben IFS (@ben_ifs) September 21, 2022
या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.हा व्हिडिओ आयएफअस अधिकारी क्लेमेंट बेन यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केला आहे.यात एक व्यक्ती चित्याच्या जवळ जाऊन सेल्फी घेत असल्याचे दिसत आहे.हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी अनेक कमेंट केल्या आहेत.यात एकाने हा व्यक्ती जिवंत आहे की नाही?, अशी कमेंट केली.