'मोबाईल वेडा श्वान...' व्हायरल 'Video' पाहून नेटकरी थक्क 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2024 12:19 PM2024-01-22T12:19:56+5:302024-01-22T12:21:31+5:30

आधी माणसांना त्यानंतर आता प्राण्यांना देखील मोबईलचे व्यसन लागल्याचे पाहायला मिळते. 

Video of dog seeing cartoon in mobile users are shocked video goes viral on social media  | 'मोबाईल वेडा श्वान...' व्हायरल 'Video' पाहून नेटकरी थक्क 

'मोबाईल वेडा श्वान...' व्हायरल 'Video' पाहून नेटकरी थक्क 

Viral Video : हल्ली मोबाईल माणसाच्या जीवनाचा विभाज्य भाग बनला आहे. आजकाल लहानांपासून- मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण रात्रंदिवस तासनतास् मोबाईलवर व्यस्त असल्याचे पाहायला मिळते. मोबाईलचा वाढता वापर हे एक प्रकारचे व्यसनचं आहे असे तज्ञांचे मत आहे. तरीसुद्धा त्याचा वापर हा सर्वात जास्त होताना दिसतो. बरं, आता तर मोबाईलचा वापर हा केवळ माणसांपूरता मर्यादित राहिला नसून त्याची प्राण्यांना देखील भूरळ पडली आहे. 

अशाच एका मोबाईल वेड्या श्वानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय. हा व्हिडीओ पाहून नेटकरी अवाक् झाले आहेत. सध्या या श्वानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हायरल व्हिडीओमध्ये एक श्वान मोबाईलवर कार्टून पाहण्यात दंग झाला आहे. गोल्डन रिट्रीवर प्रजातीचा हा श्वान मऊशार गादीवर आरामत कार्टून पाहण्याचा आनंद लूटतोय. डोळ्याची पापणीही न लवता अगदी मन लावून हा श्वान कार्टून पाहतोय, त्याचा असा अंदाज पाहून नेटकऱ्यांना नवलं वाटतंय. 

मऊ गादी, डोक्याला उशी तसेच गादीच्या चहूबाजुंनी पडदा अशी या  श्वानाची व्यवस्था करण्यात आली आहे. इंस्टाग्रामवर एका पेट लव्हर यूजरने हा व्हिडीओ शेअर केल्याचे पाहायला मिळते आहे. शिवाय व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत. 

पाहा व्हिडीओ :

मऊ गादी, डोक्याला उशी तसेच गादीच्या चहूबाजुंनी पडदा अशी व्यवस्था या श्वानाची करण्यात आली आहे. इंस्टाग्रामवर एका पेट लव्हर यूजरने हा व्हिडीओ शेअर केल्याचे पाहायला मिळते आहे. शिवाय व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया येत आहेत.

Web Title: Video of dog seeing cartoon in mobile users are shocked video goes viral on social media 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.