VIDEO : दोन कांगारूंमध्ये झाली जबरदस्त फाइट, व्हिडीओ पाहून उडेल तुमचा थरकाप!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2022 17:06 IST2022-02-08T17:04:03+5:302022-02-08T17:06:46+5:30
kangaroos Fight Viral Video : हे दोन्ही कांगारू एकमेकांचे अनेक वर्षांपासूनचे वैरी असल्यासारखे भांडत आहेत. त्यांना बघून असं वाटत आहे की, दोन मनुष्य एकमेकांसोबत भांडत आहेत.

VIDEO : दोन कांगारूंमध्ये झाली जबरदस्त फाइट, व्हिडीओ पाहून उडेल तुमचा थरकाप!
kangaroos Fight Viral Video : सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही फनी, काही हैराण करणारे तर काही थरारक लढाईचे असतात. सोशल मीडियावर सध्या असाच एक दोन कांगारूंचा जबरदस्त फाइटचा व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. हे दोन्ही कांगारू एकमेकांचे अनेक वर्षांपासूनचे वैरी असल्यासारखे भांडत आहेत. त्यांना बघून असं वाटत आहे की, दोन मनुष्य एकमेकांसोबत भांडत आहेत.
व्हायरल झालेल्या या व्हिडीओत तुम्ही बघू शकता की, कशाप्रकारे दोन्ही कांगारू एकमेकांचा गळा पकडून पायांनी एकमेकांना मारहाण करत आहेत. दोघांमध्ये कशावरून हाणामारी होत आहे हे तर माहीत नाही. पण व्हिडीओ पाहिल्यावर हा अंदाज नक्कीच लावता येतो की, त्यांचं भांडण सोडवण्याची हिंमत कुणी करणार नाही. कांगारूंच्या अशा भांडणाचा व्हिडीओ कदाचित याआधी कधी तुम्ही पाहिला नसेल.
व्हिडीओ तुम्ही बघू शकता की, दोन्ही कांगारू आपल्या शेपटीच्या आधाराने तर कधी आपल्या पायांवर उभे होऊ भांडत आहेत. जेव्हा ते लढण्यासाठी आपल्या पायांवर उभे होतात तेव्हा ६ फूट उंच एखाद्या शक्तीशाली प्राण्यासारखे दिसतात. त्याचं शरीर पाहून ते किती शक्तीशाली आहेत याचा अंदाजही येतो.
दोन कांगारूंमध्ये झालेल्या या थरारक फाइटचा व्हिडीओ इन्स्टाग्राम cutepetswild नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. लोक या व्हिडीओवर एकापेक्षा एक मजेदार कमेंट्स करत आहेत. काही लोक म्हणाले की, प्राणीही आता मनुष्यांप्रमाणे दुश्मनी करू लागले आहेत.