Video:'काला चष्मा' गाण्यावर जपानी मुलींनी धरला ठेका, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2022 12:02 PM2022-10-05T12:02:21+5:302022-10-05T12:10:20+5:30

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर बॉलीवूडच 'काला चश्मा' हे गाण चांगलच व्हायरल होत आहे. इन्स्टाग्रामवर हे गाण सध्या ट्रेंडवर आहे.

video of Japanese girls dancing on the song 'Kala Chashma' viral | Video:'काला चष्मा' गाण्यावर जपानी मुलींनी धरला ठेका, व्हिडीओ व्हायरल

Video:'काला चष्मा' गाण्यावर जपानी मुलींनी धरला ठेका, व्हिडीओ व्हायरल

googlenewsNext

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर बॉलीवूडच 'काला चश्मा' हे गाण चांगलच व्हायरल होत आहे. इन्स्टाग्रामवर हे गाण सध्या ट्रेंडवर आहे. अनेकांनी या गाण्यावर रिल्स बनवल्या आहेत. आता जपानी मुलींनी या गाण्यावर ठेका धरल्याचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ लाखो नेटकऱ्यांनी पाहिला आहे. 

या व्हिडीओत जपानी मुलींचा एक ग्रुप बॉलीवूड चित्रपट 'बार-बार देखो' यातील 'काला चश्मा'या गाण्यावर डान्स करत असल्याचा दिसत आहे. हे गाणे सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कतरिना कैफ यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये शाळेच्या गणवेशातील या मुली अप्रतिम डान्स करताना दिसत आहेत. विषेश म्हणजे या मुलींनी गाण्याची प्रत्येक स्टेप केली आहे. व्हिडीओतील जपानी मुलींचा स्वॅगही पाहण्यासारखा आहे.

Viral: हॉस्टेलच्या पंख्याखाली लोखंडाची जाळी, कारण ऐकून बसेल धक्का...

जपानी मुलींचा हा धमाकेदार डान्स व्हिडिओ इन्स्टाग्रामवर thequickstyle नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. युजरने व्हिडीओला कॅप्शनही दिली आहे. यात'Ohio Japan.' असं लिहीले आहे.आतापर्यंत अडीच लाखांहून अधिक लोकांनी याला लाईक केले आहे. 

Web Title: video of Japanese girls dancing on the song 'Kala Chashma' viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.