"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 15:17 IST2024-11-27T15:16:42+5:302024-11-27T15:17:08+5:30
आईला मेकअपमध्ये पाहिल्यानंतर मुलगा तिला ओळखत नाही आणि तिला अनोळखी व्यक्ती समजून जोरजोरात रडू लागतो.

"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
आजकाल, इतरांपेक्षा अधिक सुंदर दिसण्यासाठी, लोक अनेकदा जास्त मेकअप करून लोकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतात. अनेक वेळा हा मेकअप काही लोकांना आणखी सुंदर बनवतो. पण कधी कधी ओव्हर मेकअपमुळे ते विचित्र दिसू लागतात. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ हे व्हायरल होत आहेत. असाच एक व्हि़डीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक लहान मुलगा मेकअपनंतर आपल्या आईला ओळखत नाही आणि रडायला लागतो.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला या व्हिडीओमध्ये, आईला मेकअपमध्ये पाहिल्यानंतर मुलगा तिला ओळखत नाही आणि तिला अनोळखी व्यक्ती समजून जोरजोरात रडू लागतो. शेवटी, मुलाला असं रडताना पाहून आई त्याला तिच्या कुटुंबातील दुसऱ्या सदस्याच्या स्वाधीन करते. व्हिडिओमध्ये मेकअपमध्ये असलेली महिला खूपच सुंदर दिसत आहे, परंतु हा व्हिडीओ व्हायरल होण्यामागचे कारण अजब आहे.
व्हिडिओमध्ये कॅमेऱ्यात बघून महिला म्हणते, माझा मुलगा मला ओळखत नाही. व्हिडिओतील आईची प्रतिक्रिया पाहण्यासारखी आहे. ती म्हणते, अरे देवा! हे काय झालं? व्हिडिओमध्ये ती महिला आपल्या मुलाला ती त्याची आई असल्याचं सांगते. बाळा, मीच तुझी मम्मा आहे असं म्हणते पण मुलाचं रडणं थांबत नाही. नंतर, मुलाला गप्प करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीकडे देते.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर thejusticmemes And theindianlaugh नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, ज्यावर युजर्सकडून मजेदार कमेंट्स पाहायला मिळत आहेत. व्हिडीओ शेअर करताना 'अरे दीदी' असं कॅप्शन लिहिलं आहे. हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत असून याची जोरदार चर्चा रंगली आहे.