VIDEO : या खतरनाक रस्त्यावर आहे केवळ एकमेव ट्रॅक, ३ ते ४ दिवस डोंगर चढून इथे पोहोचतात लोक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 12:54 PM2022-04-12T12:54:40+5:302022-04-12T12:56:58+5:30

Dangerous Road : या रस्त्यावर तेच गाडी चालवू शकतात ज्यांना इथे गाडी चालवण्याचा अनुभव आहे. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

VIDEO : Only truck can run on this dangerous road, People trek the mountains for four days | VIDEO : या खतरनाक रस्त्यावर आहे केवळ एकमेव ट्रॅक, ३ ते ४ दिवस डोंगर चढून इथे पोहोचतात लोक

VIDEO : या खतरनाक रस्त्यावर आहे केवळ एकमेव ट्रॅक, ३ ते ४ दिवस डोंगर चढून इथे पोहोचतात लोक

googlenewsNext

Dangerous Road :  भारतातील डोंगराळ भागात फारच खतरनाक रस्ते आहेत. ज्यांवरून स्थानिक लोक नेहमीच ये-जा करतात. त्यांच्यासाठी ही सामान्य बाब आहे. पण जे लोक या रस्त्याने पहिल्यांदा जातात ते हे रस्ते पाहून हैराण होतात. उंच डोंगरांसोबतच खोल दऱ्या पाहूनही डोकं चक्रावून जातं. या रस्त्यावर तेच गाडी चालवू शकतात ज्यांना इथे गाडी चालवण्याचा अनुभव आहे. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

एका फेसबुक पेजवर डोंगराळ भागातील गाड्या आणि अडचणींचा सामना करणाऱ्या स्थानिक लोकांचे व्हिडीओ अपलोड केले जातात. व्हायरल झालेल्या व्हिडीओबाबत माहिती दिली आहे की, हा ट्रॅक माझं गाव उत्तराखंड येथील जोहर घाटीच्या मिलामकडे जात आहे.  हा जगातील सर्वात खतरनाक आणि अनोख्या हिमालयन रस्त्यांपैकी एक आहे.  मुनस्यारीहून मिलम ग्लेशिअरकडे ४ दिवसांच्या ट्रेकिंगनंतर एक २० किमीचा रस्ता आहे जो रिलकोटला मिलमसोबत जोडतो.

व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'या रस्त्यापर्यंत पोहोचण्यासाठी ३ ते ४ दिवसांपर्यंत ट्रेकिंग करून जवळपास ४० ते ५० किमीचं अंतर पार करावं लागतं. कारण एकमेव रस्ता आहे आणि हा ट्रक या रस्त्यावरील एकमेव परिवहन आहे. ट्रक या रस्त्यावर हेलिकॉप्टर द्वारे पाठवण्यात आला होता. तुम्ही इथे तुमची कार किंवा बाइक नेऊ शकत नाही. हा व्हिडीओ ट्विटरवर आनंद महिंद्रा यांनीही शेअर केला.
 

Web Title: VIDEO : Only truck can run on this dangerous road, People trek the mountains for four days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.