Video: कोल्ड ड्रिंकमध्ये दारू टाकून पिणाऱ्या तरूणींना पोलिसांना पकडलं आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2023 02:07 PM2023-04-10T14:07:11+5:302023-04-10T14:07:29+5:30

व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक पोलीस कर्मचारी एका तरूणीसोबत बोलत आहे आणि दुसरी एक तरूणी त्यांना अडवत आहे. यानंतर पोलीस कर्मचारी त्या तरूणीकडे वळतो आणि विचारतो की, तिच्या हातात काय आहे.

Video : Police caught the girls drinking alcohol mixed with cold drink on the road | Video: कोल्ड ड्रिंकमध्ये दारू टाकून पिणाऱ्या तरूणींना पोलिसांना पकडलं आणि मग....

Video: कोल्ड ड्रिंकमध्ये दारू टाकून पिणाऱ्या तरूणींना पोलिसांना पकडलं आणि मग....

googlenewsNext

Drunk Girls Viral Video: दारू पिऊन गाडी चालवण्यामुळे रस्त्यावर सगळ्यात जास्त अपघात होतात. तेच ट्राफिक पोलीस दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांना रोखण्यासाठी नेहमीच सतर्क असतात. चेकपोस्ट नाक्यावर ते लोकांच्या श्वासांची टेस्ट करतात. अशाच एका घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात काही तरूण पोलिसांसोबत वाद घालताना दिसत आहेत. पोलिसांनी नंतर दावा केला की, तरूण नशेत होते.

व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की, एक पोलीस कर्मचारी एका तरूणीसोबत बोलत आहे आणि दुसरी एक तरूणी त्यांना अडवत आहे. यानंतर पोलीस कर्मचारी त्या तरूणीकडे वळतो आणि विचारतो की, तिच्या हातात काय आहे. पोलीस तिच्या हातातून बॉटल हिसकावूण घेतात आणि यात काय आहे विचारतात. तरूणी त्यात कोका-कोला असल्याचा दावा करते. पण पोलीस म्हणतात की, यात दारू आहे आणि ती त्यांनी पिऊ नये. पोलीस त्यातील कोका-कोला पितात आणि लगेच थुंकतात. त्यांना हे कळालं की, त्यात दारू आहे.

पोलीस पुढे म्हणतात की, 'तुला लाज वाटायला पाहिजे, मुलगी असून दारू पिते'. यानंतर तरूणी पोलिसांना लाच देण्याचा प्रयत्न करते. पण अधिकारी तिला इशारा देतो. नंतर पोलीस तरूणीला तिच्या आईसोबत बोलण्यास सांगतात. तरूणी आपला मोबाइल काढते आणि नंबर डायल करते. फोन पोलिसांना देते. 

बाजूला त्यांच्यासोबत असलेला तरूण म्हणतो की, ते हे पैशांसाठी करतात. बराच वेळ पोलीस आणि तरूणींमध्ये वाद होता. हा व्हिडीओ HELL WALA नावाच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. 

Web Title: Video : Police caught the girls drinking alcohol mixed with cold drink on the road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.