Video - गडगंज श्रीमंत वडिलांनी घरातून बेदखल केलं अन् मुलावर आली फूटपाथवर राहण्याची वेळ!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2023 04:38 PM2023-12-08T16:38:57+5:302023-12-08T16:41:09+5:30
रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या एका अनोळखी व्यक्तीची हृदयद्रावक गोष्ट समोर आली आहे.
उत्तर प्रदेशच्या लखनौमधून रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या एका अनोळखी व्यक्तीची हृदयद्रावक गोष्ट समोर आली आहे. लखनौच्या रस्त्यांवर राहणाऱ्या या गरीब माणसाचा कुत्रा साथीदार झाला आहे. चित्रपट निर्माते आणि लेखक विनोद कापरी यांनी या व्यक्तीला कचरा गोळा करताना पाहिले आणि त्यांच्या मोबाईल कॅमेऱ्याने व्हिडीओ शूट केला. ट्विटरवर त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे.
पोस्टमध्ये चित्रपट निर्माते विनोद कापरी यांनी लिहिले, "हे 6 मिनिटं 51 सेकंद जे कधीही विसरणार नाही. लखनौमध्ये रात्री 3:15 वाजता. एका लग्नावरून परतत असताना, आम्ही शाहमीना रोडवर चहासाठी थांबलो. समोर अटलबिहारी वायपेयी सायंटिफीक कन्व्हेन्शन सेंटर आहे. अचानक मला दिसलं की एक माणूस कचरा गोळा करत आहे आणि एक कुत्रा सतत त्याच्यासोबत आहे. सतत म्हणजे सतत."
कभी नहीं भूल पाने वाले 6 मिनट 51 सेकेंड !
— Vinod Kapri (@vinodkapri) December 5, 2023
लखनऊ।
रात के सवा 3 बजे।
एक शादी से लौटते हुए चाय पीने के लिए हम शाहमीना रोड पर चाय पीने के लिए रूके।
Atal Bihari Vajpayee Scientific Convention Centre के ठीक सामने।
अचानक क्या देखा कि एक आदमी कूड़ा बीन रहा है और एक कुत्ता लगातार उसके… pic.twitter.com/JrHSvaDozP
"5-7 मिनिटे पाहत राहिलो. मग हे सर्व रेकॉर्ड करण्याचा विचार केला. रेकॉर्डिंग सुरू करताना मला वाटले की काय? डोळ्यांनी पाहिले ते कॅमेऱ्यात रेकॉर्ड होणार नाही. असं असूनही, कॅमेरा फिरवला आणि जे रेकॉर्ड केले गेले, ते किमान आपल्या सर्वांसाठी अविश्वसनीय पेक्षा अधिक अविस्मरणीय आहे. रेकॉर्डिंग चालू राहिले आणि माणूस आणि कुत्रा एकत्र चालत राहिला, अनकट! 6 मिनिटे 51."
"आम्ही त्याच्याशी चर्चा केली तेव्हा मला कळलं की त्यांचं नावं शकील आणि कल्लू (कुत्रा) आहेत. दोघेही एकत्र राहतात. एकत्र फिरतात. एकत्र झोपतात. माझं मन आनंदाने भरून आलं होतं. शकीलशी बोलल्यावर कळलं. की तो बहराइच येथील गडगंज श्रीमंत, जमीनदार कुटुंबातील आहे पण वडिलांनी दुसरं लग्न केल्यानंतर त्याला आणि त्याच्या भावांना बेदखल केले. तेव्हापासून तो फूटपाथवर राहतो. फक्त कल्लू त्याच्यासोबत आहे. शकीलला मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडून न्यायाची अपेक्षा आहे" असं ट्विटमध्ये म्हटलं आहे.