Video : लग्नाच्या दिवशीच निघाली कोरोना पॉझिटिव्ह; पीपीई कीटसह जोडप्यानं उरकलं लग्न
By manali.bagul | Published: December 7, 2020 01:44 PM2020-12-07T13:44:02+5:302020-12-07T13:51:19+5:30
Trending Viral Video in Marathi : कोरोनाकाळात शासनाने दिलेल्या गाईडलाईन्सचे पालन करून अनेक लोक लग्न लावत आहेत. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
२०२० जगभरातील सगळ्याच लोकांसाठी अविस्मरणीय ठरणारं आहे. त्यातल्या त्यात कोरोनाकाळात तडजोड करत ज्यांनी आपलं लग्न उरकलं त्यांना २०२० चांगलाच लक्षात राहिल. अनलॉक झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर लोक आपले राहिलेले समारंभ आटपत आहे. कोरोनाकाळात शासनाने दिलेल्या गाईडलाईन्सचे पालन करून अनेक लोक लग्न लावत आहेत. सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
#WATCH Rajasthan: A couple gets married at Kelwara Covid Centre in Bara, Shahbad wearing PPE kits as bride's #COVID19 report came positive on the wedding day.
— ANI (@ANI) December 6, 2020
The marriage ceremony was conducted following the govt's Covid protocols. pic.twitter.com/6cSPrJzWjR
या व्हिडीओमध्ये पाहू शकता पीपीई किट घालून वधू-वर सप्तपदी घेत आहेत. हा व्हिडीओ राजस्थानचा असून सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर सोशल मीडियावर जोक्स, मीम्सचा पाऊस पडला आहे. अनेकांनी लग्नात डिसेंबर आहे की डिसेंबरमध्ये लग्न असंही म्हटलं आहे.
या लग्नासाठी उपस्थित असलेले भटजीसुद्धा पीपीई किटमध्येच आहेत. नवऱ्या मुलीने आपली कोरोना टेस्ट केली होती. त्याचे रिपोर्ट्स लग्नाच्या दिवशी आले आणि हा रिपोर्ट पॉजिटिव्ह आला. त्यानंतर नवरीला कोविड सेंटरमध्ये नेण्यात आलं. लग्नाची पूर्ण तयारी झाली होती. ऐनवेळी लग्न रद्द करण्यापेक्षा या जोडप्याने सरकारने दिलेल्या गाईडलाईन्सचे पालन करत लग्न करण्याचा निर्णय घेतला. बापरे! कधीही पाहिली नसेल दोन वाघांमधील 'अशी' लढाई; पाहा थरारक व्हिडीओ
नेटिझन्सनी हा व्हिडीओ पाहून कमेंट्सचा वर्षाव केला आणि शुभेच्छा दिल्या आहेत. आतापर्यंत ९५ हजारांपेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडीओ पाहिला असून ४ हजारांपेक्षा जास्त लाईक्स या व्हिडीओला मिळाले आहेत. २८ सेंकदाचा व्हिडीओ पाहून तुम्हीही या जोडप्याचं कौतुक कराल. Video : पाठवणीनंतर रड रड रडली अन् निघाला मेकअप; खरं रूप दिसताच नवऱ्यानं केलं असं काही