Video: बाईकवर स्टंट... 'किस' करत जादू की झप्पी देणाऱ्या युवतींवर नेटीझन्स संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2023 02:59 PM2023-05-04T14:59:50+5:302023-05-04T15:19:53+5:30

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत दोन तरुणी चालत्या बाईकवर बसून स्टंट करताना दिसत आहेत

Video: Stunt on a bike... Netizens are angry with girls who give magic by kissing | Video: बाईकवर स्टंट... 'किस' करत जादू की झप्पी देणाऱ्या युवतींवर नेटीझन्स संतापले

Video: बाईकवर स्टंट... 'किस' करत जादू की झप्पी देणाऱ्या युवतींवर नेटीझन्स संतापले

googlenewsNext

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. यापूर्वीही अनेकदा स्टंट करणारे व्हिडिओ व्हायरल झाल्याचं आपण पाहिलं. तर, बाईकवरुन स्टंट करणारे कपलही सोशल मीडियावर झळकले आहेत. या कपल्सला पोलिसांनी चांगलाच धडाही शिकवला. मात्र, आता आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, चक्क दोन तरुणी बाईकवरुन स्टंट करत आहेत. यासोबतच, या तरुणी एकमेकांना किस करुन जादू की झप्पीही देताना दिसत आहेत. नेटीझन्सने तरुणींच्या या व्हिडिओवर चांगलाच संताप व्यक्त केला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत दोन तरुणी चालत्या बाईकवर बसून स्टंट करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे तरुणींनी चालत्या बाईचा हँडल मोकळा सोडून दिला आहे. दोन तरुणींपैकी एक तरुणी बाईकवर उलटी बसली असून या तरुणी स्टंटबाजी करत एकमेकींना किसही करताना व्हिडिओत दिसत आहे. किस घेतल्यानंतर दोघीही एकमेकांना मिठी मारतात. त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या एका वाहन चालकाने हा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. स्टार्स ऑफ झारखंड या इंस्टा अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय. तसेच, सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्मवरही व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

दरम्यान, नेटीझन्सने हा व्हिडिओ पाहून संताप व्यक्त केला आहे. तसेच, या मुलींना पोलिसांना धडा शिकवला पाहिजे, अशा कमेंटही केल्या आहेत. त्यासोबतच, काहींनी मुलांना संस्कार नसल्याचंही म्हटलंय. मात्र, हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, यावर काही कारवाई झाली का, याबाबत अद्याप माहिती समोर आली नाही. 
 

Web Title: Video: Stunt on a bike... Netizens are angry with girls who give magic by kissing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.