Video - हृदयद्रावक! 430 फूट उंचावरून 'तो' पडला; आई-व़डिलांच्या डोळ्यादेखत मुलाचा दुर्दैवी अंत झाला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2022 03:51 PM2022-03-28T15:51:32+5:302022-03-28T15:52:55+5:30

अमेरिकेतील ओरलँडमध्ये एका उंच पाळण्यावरून खाली पडून एका मुलाचा मृत्यू झाला आहे.

Video teenager fell down in front of parents 430 feet speed 120 km per hour in theme park | Video - हृदयद्रावक! 430 फूट उंचावरून 'तो' पडला; आई-व़डिलांच्या डोळ्यादेखत मुलाचा दुर्दैवी अंत झाला

Video - हृदयद्रावक! 430 फूट उंचावरून 'तो' पडला; आई-व़डिलांच्या डोळ्यादेखत मुलाचा दुर्दैवी अंत झाला

Next

मोठमोठ्या आकर्षक पाळण्यांमध्ये बसायला अनेकांना आवडतं. पण कधी कधी हे जीवघेणं ठरू शकतं. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. अमेरिकेतील ओरलँडमध्ये अशाच एका उंच पाळण्यावरून खाली पडून एका मुलाचा मृत्यू झाला आहे. हा मुलगा ज्या थीम पार्क राईडवरून खाली पडला त्याचं नाव ओरलँडो फ्री फॉल राइड असं आहे. या भयंकर घटनेनंतर मुलाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्याचा मृत्यू झाला. ही दुर्घटना घडली तेव्हा मुलाचे आई-वडील जवळच उभे होते.

आई-व़डिलांच्या डोळ्यादेखतच मुलाचा दुर्दैवी अंत झाला आहे रिपोर्टनुसार, जवळपास 120 किलोमीटर प्रतितास या वेगाने हा मुलगा तब्बल 430 फूट उंचीवरून खाली पडल्याचं सांगण्यात येत आहे. या राईडच्या वेळी मुलाने सेफ्टी बेल्ट बांधला होता की नाही, हे स्पष्ट झालेलं नाही. याबाबत तपास सुरू आहे. रात्री 11 वाजता ही दुर्घटना घडली. उद्यानातील कर्मचाऱ्यांनी या घटनेनंतर सांगितलं की, सुरुवातीला जेव्हा हा मुलगा खाली पडला, तेव्हा त्यांना वाटलं की पाळण्याचा तुकडा पडला आहे. परंतु, नीट पाहिल्यानंतर एक मुलगा खाली पडल्याचं लक्षात आलं.

थीम पार्कमधील ड्रॉप टॉवर राईड गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सुरू झाली. याआधी 2020 मध्ये एका कर्मचाऱ्याचा दुसऱ्या एका प्रकारच्या राइडवरून पडून मृत्यू झाला होता. 430 फूट वर गेल्यावर या राईडमध्ये पाळणा ताशी 120 किलोमीटर वेगानं खाली येतो. त्याचवेळी हा मुलगा कसा पडला झाला, हा तपासाचा विषय आहे. पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. या राइड कंपनीचा मालक स्लिंगशॉट ग्रुप आहे. त्याचे सीईओ मीडियाशी बोलताना म्हणाले की, आम्ही संपूर्ण सुरक्षिततेने राइड चालवतो. सर्व सुरक्षा नियमांचे पालन केलं जातं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: Video teenager fell down in front of parents 430 feet speed 120 km per hour in theme park

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.