Video - तुफान राडा! तरुणी रस्त्यातच भिडल्या, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, पोलीस आला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2023 03:10 PM2023-05-13T15:10:41+5:302023-05-13T15:11:05+5:30

एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये काही मुली रस्त्याच्या मधोमध जोरदार भांडताना दिसत आहेत.

Video The cop just walks in there and pepper sprays everyone and walks away | Video - तुफान राडा! तरुणी रस्त्यातच भिडल्या, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, पोलीस आला अन्...

Video - तुफान राडा! तरुणी रस्त्यातच भिडल्या, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, पोलीस आला अन्...

googlenewsNext

सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होतात जे कधी आश्चर्यचकित करतात, कधी घाबरवतात तर कधी हसतात. नुकताच असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये काही मुली रस्त्याच्या मधोमध जोरदार भांडताना दिसत आहेत. या मुली एकमेकांचे केस आणि कपडे ओढत आहेत. ते एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारत आहेत. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक आश्चर्यकारक घटना घडत आहे. मुली भांडत असताना एक पोलीस भांडणाऱ्या मुलींच्या जवळ येतो. तो त्या मुलींना वेगळं करत नाही किंवा अटकही करत नाही. उलट तो त्यांच्यावर पेपर स्प्रे मारतो. हे सर्व पाहून आजूबाजूचे लोक आश्चर्यचकित होतात.

घाबरलेल्या मुली एकमेकींचे केस सोडून खोकत खोकत बाजुला होतात. यानंतर काही मुली पुन्हा एकमेकांशी भिडल्या असून एकमेकींना लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, तो पोलीस पुन्हा तेथे पोहोचतो आणि त्यांच्यावर पेपर स्प्रे मारतो आणि पुढे निघून जातो. हा व्हिडीओ कुठचा आहे हे माहीत नसले तरी व्हिडीओच्या कमेंटमध्ये काही लोकांनी तो मिसौरीच्या कन्सास सिटीचा असल्याचे सांगितले आहे.

सोशल मीडियावर अनेकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे. अनेकजण या पोलिसाचे कौतुक करत आहेत तर अनेकजण मुलींच्या या मारामारीचा आनंद घेत आहेत. व्हिडिओमध्ये गर्दीचा रस्ता आहे पण मुलींची मारामारी थांबवण्याचा प्रयत्न कोणीही करताना दिसत नाही. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: Video The cop just walks in there and pepper sprays everyone and walks away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.