Video: दिवाळीला हॉस्टेलमध्ये सुरू झाले तिसरे महायुद्ध, विद्यार्थ्यांनी एकमेकांवर डागले रॉकेट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 06:33 PM2024-10-31T18:33:09+5:302024-10-31T18:33:48+5:30
दोन हॉस्टेलमध्ये सुरू झालेले युद्ध सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हॉस्टेल एक अशी जागा आहे, जिथे मुले त्यांच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय क्षण घालवतात. हॉस्टेलमध्ये मित्रांसोबतच्या मौजमजेपासून ते भांडण अन् अनेक आठवणी मुलांच्या कायम लक्षात राहतात. अनेकदा हॉस्टेलमध्ये राहणाऱ्यांना सणासुदीत त्यांच्या घरी जाता येत नाही. मग ते हॉस्टेलमध्येच आपल्या मित्रांसोबत सण साजरे करतात. सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यात हॉस्टेलमध्ये राहणारी मुले अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी करताना दिसत आहेत.
हॉस्टेलच्या मुलांमध्ये 'तिसरे महायुद्ध'
व्हायरल व्हिडिओध्ये हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलांच्या दोन गटात तिसरे महायुद्ध पेटल्याचे दिसत आहे. ही दोन गटातील मुले आपापल्या हॉस्टेलमधून समोरच्या हॉस्टेलवर रॉकेट आणि बॉम्ब टाकत असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. यावेळी दोन्ही गटातील विद्यार्थी रॉकेटने एकमेकांना चोख प्रत्युत्तर देत आहेत. या फटाक्यांमुळे हॉस्टेलच्या खोल्यांमध्ये आगही लागल्याचे दिसते. सध्या हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.
Kalesh b/w Two groups of Hostel boys with Crackers during Diwali Celebration
— Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) October 30, 2024
pic.twitter.com/fuLsY8mg36
नेटकऱ्यांचा मजेशीर कमेंट्स
हा व्हायरल व्हिडीओ कुठचा आहे, याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही. पण, हा दिवाळीच्या काळातील असल्याचे बोलले जात आहे. हा व्हिडिओ सोशल साईटवर शेअर करण्यात आला असून, या व्हिडिओवर अनेकांनी मजेशीर कमेंटही केल्या आहेत. एका यूजरने लिहिले - हा हल्ला इस्रायल आणि लेबनॉनमधील युद्धापेक्षा जास्त धोकादायक वाटतो. दुसऱ्याने लिहिले - एक दिवस ही मुले आपला भारत महासत्ता बनवतील.